google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

नाशिकमध्ये अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची पथकाच्या कारला धडक

author
0 minutes, 0 seconds Read

चांदवड तालुक्यातील हरनुल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या गाडीला अवैध वाहतुक करणाऱ्या कारने कट मारल्याने पथकाची स्कॉर्पिओ उलटून अपघात झाला आहे. या अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला असून पथकातील ३ कर्मचारी गंभीर जखमी आहेत. यात २ पोलिसांचा समावेश आहे.

घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवड असा सव्वाशे किलोमीटरचा पथकाने सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला. या दरम्यान अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या कारने पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खाजगी कार आहेत.

दरम्यान, घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक फौजफाट्यासह पोहचले असून अधिकचा तपास सुरु आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *