google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सुर्डी राजेगाव रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिक उतरणार रस्त्यावर…

author
0 minutes, 0 seconds Read

सुर्डी राजेगाव रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सुर्डी राजेगाव सह या मार्गावरील सर्व नागरिक 12 जुलै रोजी उतरणार रस्त्यावर
शेगाव,उमापूर,तलवडा,सुर्डी राजेगाव या रस्त्याचे काम 2019 पासून सुरू आहे हे काम सुर्डी पर्यंत येऊन थांबलेले होते.
परंतु या मार्गावरील गावकऱ्यांनी आंदोलन मोर्चे करून सदरील काम सुरू करण्यास भाग पाडले परंतु काम सुर्डी कडून पहिला टप्पा करणे गरजेचे होते तसे न होता शेवट चा टप्पा म्हणजे सावरगाव कडून सुरू करण्यात आले ते पूर्णत्वास आहे.


सुर्डी राजेगाव टप्याचे काम अध्याप सुरू नाही सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या अगोदर देखील या रस्त्यावर अपघात झालेले आहेत आणखी पावसामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे गावकरी मुठीत जीव धरून प्रवास करत आहेत वारंवार सांगून भेटून देखील संबधीत विभाग आणि प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत या विरोधात सुर्डी राजेगाव सह या मार्गावरील सर्व नागरिक 12 जुलै रोजी प्रशासनाची दातखिळी उघडण्यासाठी तहसील समोर करणार धरणे आंदोलन या आंदोलनाचे माननीय तहसीलदार यांना निवेदना द्वारे माहिती दिली.

यावेळी अनिल साळवे,राहुल कचरे,डॉ.जनक चौरे,संतोष जाधव,रामचंद्र चिंचाने,बाळू बदाडे,नितीन कचरे,अतुल पोपळघट,सचिन इंगळे,गोविंद कोकाटे,आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *