google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

चॅम्पियन इंडियन

author
0 minutes, 0 seconds Read

क्रिकेट या खेळाला जन्मजरी इंग्लंडने दिला असला तरी क्रिकेट हे वाढलं मोठं झालं ते या भारत देशातच हे कोणीही नाकारू शकणार नाही.


टी 20 वर्ल्डकप फायनल आपण खेळणार होतोच कारण संपूर्ण बॅलन्स टीम घेऊन रोहित कॅप्टन्सी करत होता.
आपण पूर्ण टूर्नामेंट चांगली खेळलो प्रत्येकाचा परफॉर्मन्स योग्य वेळी कामी आला( उदा: याच मॅचचा प्लेएर ऑफ दि मॅच विराट कोहली ) या विजयाच श्रेय सर्वांना आहेच पण बादशहा बुमराह याला खिताब मिळाला प्लेअर ऑफ दि टूर्नामेंट हे पाहून खूप भारी वाटलं कारण आज पर्यंत फक्त भारताच्या बॉलिंग युनिटवरच गेली कित्येक दशके टीका होत होती आज सर्वाना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील जागातील सर्वात चांगल बॉलिंग युनिट आज टीम इंडिया कडे आहे.
15 व्या ओव्हरला क्लासेनने अक्सर पटेलच्या ओव्हरला घेतलेले 24 रन्स या वेळी सर्वानाच वाटलं कि भारताच्या हातून सामना निसटला पण कुठंतरी एक विषय डोक्यात घोंगावत होता तो म्हणजे बादशहा बुमराहा च्या दोन ओव्हर आणि ह्याच दोन ओव्हरने परत भारताचे सामन्यात पुनरागमन करण्यात उपयोगी ठरल्या
रोहित ने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला पहिल्या रोहित लवकर बाद झाला पण कोहलीने पहिलाच बॉल मिडल करून एक मोठी इनिंग खेळण्याचा इशारा दिला आणि त्याने ते सत्यात उतरवल देखील पुढच्याच ओव्हर मध्ये रिषभ पंथ त्या पाठोपाठ सूर्यकुमार देखील आऊट झाला आणि रोहित शर्माचा मास्टर स्ट्रोक म्हणून अक्सर पटेलला बॅटिंगला थ्री डाऊनला पाठवलं आणि कोहली सोबत जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड केली सामन्यात भारताचा दबदबा कायम ठेवला थोड्याश्या हलगर्जी पणाने तो रनआउट झाला इतक्या मोठ्या प्लेटफॉर्म वर अशी चूक व्हायला नको होती कारण त्याने चांगली लय पकडली होती आणि नंतर शिवम दुबेने आक्रमक फलंदाजी करत एका योग्य फायटिंग टोटल पर्यंत भारताला घेऊन गेले केशव महाराज,रबाडा,यांसन, शम्सी, सर्वच आफ्रिकन बॉलरने देखील चांगली कामगिरी केली असे म्हणता येईल.
भारताच बॉलिंग युनिट आज पर्यंतच्या क्रिकेट इहासातीत सर्वात टफ बॉलिंग युनिट आहे साऊथ आफ्रिकेची बॅटिंग चालू झाली डी कॉक आणि मार्क्रम यांनी सुरुवात केली भारताने सुटूवातीलाच दोन झटके देऊन त्यांची टॉप ऑर्डर कोल्याप्स केली तरी घट्ट पाय रोवून डी कॉक त्याच्या स्वभावा विरुद्ध बॅटिंग करत होता अगदी संयमाने त्याला चांगली साथ लाभली ती स्टब्सची पण लांभून स्विप मारण्याच्या नादात स्टब्स अक्षरच्या आर्म बॉल वर आउट झाला आणि पुढे आक्रमक ज्याने आय पी एल हायस्कोरिंग रन्सने गाजवल तो क्लासेन आला आणि त्याने आपल्या जबरदस्त 23 बॉल 50 खेळीच्या जोरावर मॅच बॉल टु रन आणून ठेवली आणि काहीकाळ सर्वांनाच वाटलं कि भरतान सामना गमावला आपण विश्वकप हरलो पण बुमराहा च्या दोन ओव्हर नेहमी प्रमाणे डेथ ओव्हर कामी आल्या डी कॉक बाद झाल्या नंतर क्लासेन देखिल बॉल वर न पोहचता लांबून कव्हर वरून खेळण्याच्या नादात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर कीपर कडे कॉट आउट झाला आणि त्या पाठोपाठ बादशहा बुमराहा चा भेदक मारा बॅट पॅड च्या मधून यांसन क्लीन बोल्ड केला भारताच सामन्यात पुनरआगमन झालं तरीही एका बाजूला डेव्हिड मिलर उभा होताच तो जागातील उत्कृष्ट फिनिशर आहे हे सर्वांनाचं ज्ञात आहे म्हूणनच त्याला किलर मिलर म्हणतात हार्दिक पांड्याचा लोवर फुलटॉस बॅट ला मिडल झाला नाही आणि अविस्मरणीय झेल सूर्यकुमार यादवने टिपला अगदी राहुल द्रविडची पूर्वी ऍड यायची तसाच कॅच झाला लॉस दि कॅचेस लॉस दि मॅचेस टेक दि कॅचेस विन दि मॅचेस आणि आपण वर्ल्डकप बारबडोस विंडीस मधून इंडियात घेऊन येणार यावर शिक्का मोर्तब झाला खूप भावुक क्षण याची देही याची डोळा अनुभवायला मिळाले अत्यानंद
सर्व क्रिकेट रसिकानी या सामान्या मनमुराद आनंद लुटला
साऊथ आफ्रिका सुद्धा पहिल्यांदाच फायनल कॉलीफाय झाली आणि पूर्ण टूनांमेंट जबरदस्त क्रिकेट खेळली
रोहित,विराट,सूर्याकुमार,रिषभ, शिवम,हार्दिक,अक्सर,रवींद्र, कुलदीप,बुमरहा,अर्षदीप आणि महत्वाचं हेड कोच राहुल द्रविड सर्वांच मनस्वी अभिनंदन
विराट या नंतर टी 20 खेळणार नाही आणि द्रविडची देखील कोच म्हणून शेवटची मॅच होती सर्व प्लेएरच्या डोळ्यातील अनंदआश्रू खूप काही सांगत होते आमच्या शुभेच्छा सर्वसामान्य क्रिकेट रसिक म्हणून कायम तुमच्या सोबत असतिलच

लेखक

प्रफुल्ल वाघ, नाशिक
9657576752

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *