नाशिक मध्य मतदारसंघातहिंदूत्ववादाचाच विजय होणार,आ. देवयानी फरांदे यांचा विश्वास

नाशिक ( प्रतिनिधी)- हिंदूत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे. ती माझी अस्मिता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, त्याप्रमाणे हिंदूत्व ही सर्वसमावेशक जीवनशैली आहे. यावर माझी अतीव श्रध्दा व निष्ठा असल्याचे प्रतिपादन प्रा. देवयानी फरांदे यांनी केले. मध्य नाशकात झालेल्या प्रचारफेरी दरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.या निवडणुकीत भरघोस मते मिळून हिंदूत्ववादाचा विजय निश्चितपणे होणार असा विश्वासही प्रा. देवयानी […]

“नाशिक पूर्वचे महायुती उमेदवार आमदार राहुल ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन”

नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या निमाणी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी, ७ नोव्हेंबर रोजी, गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उमेदवार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, अरुण पवार, सुनीता पिंगळे, हेमंत शेट्टी, प्रियांका […]

“महिला कर्मचाऱ्याच्या निवडणूक ड्युटी रद्द अर्जावर नायब तहसीलदारांकडून दुर्लक्ष; प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह”

नाशिक :- नाशिकमधील S.M.R.K.B.K.A.K. महिला महाविद्यालयातील श्रीमती संजोगा अहिरवार यांनी आपल्या मुलीच्या गंभीर प्रकृतीमुळे विधानसभा निवडणूक २०२४ साठीची नियुक्ती रद्द करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज केला आहे. डॉक्टरांनी मुलीची बाळंतपणाची तारीख २० नोव्हेंबर २०२४ दिली असून, या काळात निवडणूक कामकाजात सहभागी होणे त्यांच्या दृष्टीने शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्जासोबत संबंधित वैद्यकीय कागदपत्रे […]

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही भ्रष्टाचाराचे आरोप

नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील जाहीर सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. काँग्रेसवर जातीवादाचा धोकादायक खेळ खेळल्याचा आरोप करत मोदी म्हणाले, “काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी समाजातील लोकांना पुढे येताना पाहू शकत नाही.” मोदींनी नाशिकच्या विकासाचा मुद्दा मांडत भाजप महायुतीच्या सरकारने नाशिकसाठी विकासाच्या योजना राबवून रोजगाराच्या संधी […]

नाशिक : १२ दिवसांपासून बेपत्ता सराफ व्यावसायिकाचा शोध अधांतरी; शिंदे गावात अस्वस्थता

नाशिक – पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गावातील २७ वर्षीय सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे १२ दिवसांपासून बेपत्ता असल्याने संपूर्ण शिंदे गाव आणि नाशिक रोड परिसरात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस विभाग, सुशांतचे कुटुंबीय, मित्रपरिवार, आणि गावकरी त्याच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत असले, तरी अद्याप कोणताही ठोस धागादोरा लागलेला नाही. घटनाक्रम २७ ऑक्टोबरला […]

नाशिक: गोदाघाटावर छटपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; उत्तर भारतीय बांधवांची प्रचंड गर्दी

नाशिक – कार्तिक चतुर्थी निमित्त उत्तर भारतीय बांधवांनी गोदाघाटावर आज सायंकाळी छटपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत श्रद्धाळूंनी नदीपात्रात उभे राहून छटमातेचे पूजन केले. गोदाघाटावरील गर्दीने सायंकाळनंतर पाय ठेवायलाही जागा नव्हती. यावेळी व्रतस्थ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नदीत उभे राहून पूजन केले, तर विविध प्रकारच्या फळे व पूजासामुग्री सजवून अर्पण करण्यात […]

ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर :  ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांचे प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील मतदान शहरी भागापेक्षा अधिक दिसून येते. प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. प्रत्येक मतदाराचे मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपूर येथून नोकरीनिमित्त बाहेर स्थलांतरीत झालेले मतदार मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावतील, असा […]

नाशिक मध्य विधानसभा : कमळ फुलणार, फरांदेंचा विजय निश्चित

नाशिक (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात नाशिक मध्य मतदारसंघात महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अंकुश पवार यांनी माघार घेतल्याने महायुतीच्या भाजप उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. काल (दि. ७) फरांदे यांनी मनसे नेते आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. गेल्या दोन पंचवार्षिक […]

नाशिक पूर्वचे महायुती उमेदवार राहुल ढिकले यांचा प्रभाग २०, २१ मध्ये प्रचार दौरा – ज्येष्ठ नागरिकांचे घेतले आशीर्वाद

नाशिक – नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि तरुण नेतृत्व असलेले आमदार राहुल ढिकले यांनी नाशिकरोड परिसरातील प्रभाग २० आणि २१ मध्ये प्रचार दौरा केला. ॲड. ढिकले यांनी जय भवानी रोड, कमला पार्क, कदम डेअरी, जगताप मळा, लवटे नगर १, वास्तु पार्क, गायकवाड मळा, सावता माळी स्टीलमागे, औटे मळा परिसरातील नागरिकांची भेट घेतली आणि […]

आ. देवयानी फरांदे यांना विविध समाजघटकांचा वाढता पाठिंबा – विकासकामांमुळे विश्वासार्हता दृढ

नाशिक – भारतीय जनता पक्षाच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विकासाच्या दिशेने घेतलेली ठोस पावले आणि ‘माझं नाशिक, माझी जबाबदारी’ या ब्रीदाचे कटाक्षाने पालन केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे. विविध समाजघटकांनी त्यांना समर्थनपत्रे देत त्यांची उमेदवारी जाहीरपणे समर्थित केली आहे. श्री संत सावतामाळी समाजमंदिराचे अध्यक्ष गोविंद विधाते यांच्या […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427