नाशिक – नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि तरुण नेतृत्व असलेले आमदार राहुल ढिकले यांनी नाशिकरोड परिसरातील प्रभाग २० आणि २१ मध्ये प्रचार दौरा केला. ॲड. ढिकले यांनी जय भवानी रोड, कमला पार्क, कदम डेअरी, जगताप मळा, लवटे नगर १, वास्तु पार्क, गायकवाड मळा, सावता माळी स्टीलमागे, औटे मळा परिसरातील नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
ढिकले यांनी नागरिकांना येत्या काळात सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन देत ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे, संभाजी मोरुस्कर, हेमंत गायकवाड, राम कदम, नितीन खोले, अंबादास पगारे, रमेश धोंगडे, कोमल महेरोलिया, संतोष झाल्टे, नितीन चिडे, विनोद यादव, दीपक लोणकर, फकीरराव कदम, वामनराव कदम, दिलीप कदम, संजय कदम, गणेश खांडरे, रमेश लवटे, अनिल लवटे, विजय कदम आणि इतर नागरिक उपस्थित होते.
प्रचार दौऱ्यात ॲड. ढिकले यांनी जनतेशी संवाद साधत त्यांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेतल्या. या भागातील नागरिकांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या प्रचारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.