नाशिक – कार्तिक चतुर्थी निमित्त उत्तर भारतीय बांधवांनी गोदाघाटावर आज सायंकाळी छटपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत श्रद्धाळूंनी नदीपात्रात उभे राहून छटमातेचे पूजन केले. गोदाघाटावरील गर्दीने सायंकाळनंतर पाय ठेवायलाही जागा नव्हती.
यावेळी व्रतस्थ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नदीत उभे राहून पूजन केले, तर विविध प्रकारच्या फळे व पूजासामुग्री सजवून अर्पण करण्यात आली. छटपूजेच्या कार्यक्रमानंतर रामकुंड परिसरातील वाहतूक पोलिसांनी बंद ठेवली होती.
उद्या, सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देत विधिवत छटव्रताची सांगता होणार आहे.