नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या निमाणी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी, ७ नोव्हेंबर रोजी, गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उमेदवार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, अरुण पवार, सुनीता पिंगळे, हेमंत शेट्टी, प्रियांका माने, विजय करंजकर, प्रवीण तिदमे व अन्य महायुती पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गिरीश महाजन यांनी “लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय ठरली असून त्याचा लाभ महायुतीला निश्चितच मिळणार आहे” असे मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी अनेक अपूर्ण योजनांसाठी सर्वांच्या सहकार्याने काम करण्याचे आवाहन केले. बाळासाहेब सानप यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत ढिकले यांना विजयी करण्याचे आवाहन केले.