बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत बस पासचे वितरण …..

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या एकूण ३० विद्यार्थिनींना नासिकरोड पंचवटी आगारचे वाहतूक नियंत्रक श्री.अरुण वांबळे यांनी बिटको कॉलेज येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची मोफत बस पास योजना अंतर्गत मोफत बस पासचे वितरण करण्यात आले. प्रारंभी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती सुनिता नेमाडे व पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे यांची भेट घेऊन उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थिनींना महामंडळाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पास योजनेची माहिती दिली . मोफत बस पास मिळाल्यानंतर विद्यार्थिनींना मनस्वी आनंद झाला .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427