नाशिक: “जिथे कमी तिथे आम्ही” या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने नवरात्रीच्या पूर्वसंध्येला दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणि अन्नदानाचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंना वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत वही, पेन्सिल, पाट्या, मुलींसाठी सॅनिटरी पॅड, शाळेतील विज्ञान शाखेत पंखा, पटांगणात व्यावसायिक छत्री, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, आणि सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व ड्रायफ्रूट्सचे अन्नदान करण्यात आले.
शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार पेन सेट देऊन करण्यात आला. हा उपक्रम ठाणगाव, तालुका सिन्नर येथील विविध शाळांमध्ये राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव, अपर्णा बापटे, अश्विनी पाटील, आणि संदीप देव होते. प्रसिद्ध उद्योजक हरीश गुरुनानी यांनी मार्गदर्शन केले. महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार आणि कर्नल मच्छिंद्र शिरसाट यांनी मोलाचे सहकार्य केले.
शाळेच्या वतीने सहाय्यक शिक्षक संजय भांगे, बापू गोविंद, श्रीमती सुवर्णा शिरसाट, श्रीमती ज्योती शिरसाट आणि मुख्याध्यापक राजाराम आहेर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आभार मानले.