राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री भुसे यांचे हातून नाशिकला पारितोषिक वितरण
नाशिक :- वडगाव पिंगळा (ता सिन्नर )ग्रामपंचायत व संपूर्ण गावाने अटल भूजल ग्राम स्पर्धा सन 2023 मध्ये भाग घेऊन एकमताने या उपक्रमात सहभागी होऊन गावच्या कामास प्राधान्य देऊन जे काम केले त्या कामाचे फलित म्हणून आपल्या गावाला जिल्हास्तरीय क्रमांकाचे प्रथम पारितोषिक रक्कम रू.५० लक्ष चे पारितोषिक मिळाले या पारितोषिक वितरनाचा कार्यक्रम आज दिनांक ०९/०९/२०२४ रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे झाला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आ. मा. श्री.गुलाबराव पाटील साहेब नाशिक जिल्हाचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे साहेब व अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री यांचे हातून पारितोषिक स्वीकारताना आपल्या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती शेवंताबाई गेनुजी मुठाळ ,ग्रामविकास अधिकारी* श्रीमती.आर .के रेपाळ ,ग्रामपंचायत सदस्य श्री.गोकुळ मुठाळ ,श्री.सुदाम सानप त्याचबरोबर आपल्या गावचे कृषी अधिकारी श्री महेश कुमार गरुड साहेब सिन्नर पंचायत समिती नायगाव गटाचे विस्तार अधिकारी श्री पगार साहेब ,अटल भूजलचे कर्मचारी सौ. श्रुतिका आढाव मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी वडगावं पिंगळा ग्रामपंचायत व संपूर्ण गावाने यापुढेही असेच राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये भाग घेन्यासाठी वडगावं पिंगळा गावाने संकल्प केला आहे.