नाशिक:- ए थ्री एन या भारत सरकार मान्यता प्राप्त संस्थेच्या माध्यमातून देशातील 22 राज्यात शिशु विकास योजना ही महत्वकांक्षी योजना राबवली जात असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य शैक्षणिक तसेच आर्थिक सुरक्षितता प्रदान केली जाणार आहे.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 200 पेक्षा जास्त प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांचा सीएसआर फंड आणि बाराशे पेक्षा जास्त एनजीओ संस्था या योजनेसाठी लागणारा निधी उभारण्याचे काम करत असतात या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत देशातील जवळपास 35 लाख विद्यार्थ्यांना आरोग्य विमा मिळालेला आहे त्याचबरोबर 30 ते 32 लाख विद्यार्थ्यांना व पालकांना 27 लाखाच्या जवळपास पर्सनल एक्सीडेंटल इन्शुरन्स मिळालेला आहे तर दीड कोटीपेक्षा जास्त मुलींना स्कॉलरशिप मिळालेली आहे 85 ते 90 हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत ही मिळालेली आहे.
2019 पासून चालत असलेली ही योजना देशातल्या बावीस राज्यांमध्ये काम करत आहे या योजनेमध्ये आत्तापर्यंत 35 लाख विद्यार्थ्यांनी नोंद केलेली आहे तर या नोंदीमध्ये काम करून सहकार्य करणाऱ्यांना रोजगार मिळाला आहे देशामध्ये 12000 पेक्षा जास्त बेरोजगारांना रोजगार या माध्यमातून उपलब्ध झाला आहे एकूण 1626 एनजीओ आत्तापर्यंत याच्यात जोडलेले आहेत तर कंपनीने आतापर्यंत साडेपाच कोटी चे आसपास फंड रिलीज केला आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक पंचवटी कारंजा येथे समर्पण स्वाधार. आपलं फिल्म प्रोडक्शन. श्री भक्तीधारा अध्यात्मिक परिवारा. यांच्या संयुक्त कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे या सुविधांमध्ये पाच लाखाच्या आत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील पाच ते सोळा वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना आरोग्य विमा अपघाती विमा दिला जाणार आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला आरोग्य शैक्षणिक आणि आर्थिक सुरक्षा देणे हाच संस्थेचा हेतू आहे लवकरच पुणे संभाजीनगर सातारा कोल्हापूर नाशिक नागपूर अमरावती अशा ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल उभारण्याचीही कंपनीकडून तयारी सुरू आहे.
या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला दरवर्षी 25 हजार रुपयांचा आरोग्य विमा पाच लाख रुपये पर्यंत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर 900 रुपये ते 3000 रुपये इयत्ता आठव्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर 900 रुपये ते पाच हजार रुपये इयत्ता दहावीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर 900 रुपये ते 7000 रुपये पर्यंत त्याची उपस्थिती व गुणवत्ता यावर आधारून शिष्यवृत्ती मिळेल मुलीचे 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दोन लाख रुपये पर्यंत स्वयंरोजगारासाठी मदत केली जाते.
या योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र फोटो फॅमिली फोटो एक रजिस्टर मोबाईल नंबर ईमेल आयडी आई वडिलांचे आधार कार्ड अशी कागदपत्रे लागणार आहेत जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहिती करिता संस्थेचा टोल फ्री नंबर 18003095532.. किंवा महाराष्ट्र हेड ऑफिस 9529117454..
नाशिक परिमंडल साठी 9405690179
या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती पत्रकारांशी बोलताना हभप श्रीमंत महाराज बागल लातूरकर यांनी दिली.