जागतिक वारसा साल्हेर महादुर्गसंवर्धन मोहिमेत भरपावसात श्रमदान

author
0 minutes, 0 seconds Read

किल्ल्याच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगडे अभ्यासपूर्ण रचली,
कचरा ही केला संकलित,

नाशिक :- यूनोस्कोचे मानांकन मिळालेल्या राज्यातील १२ किल्ल्यात नाशिकच्या बागलाण भागातील किल्ले साल्हेरला मानांकन मिळाले यनिमित्ताने नाशिकच्या पुरातत्व विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील ९ दुर्गसंवर्धन संस्थेच्या उपस्थितीत किल्ले साल्हेरवर महादुर्गसंवर्धन मोहीम झाली. या मोहिमेत भर पावसात उतुंग साल्हेर गडाच्या पायऱ्यावरील अस्ताव्यस्त दगड काढून एक बाजूला अभ्यासपूर्ण उभे आडवे रचून किल्ल्याच्या वरून निखळणारी मातीची झिज थांबवने,पाणी जमिनीत जिरवणे, तसेच किल्ल्यावरील कचरा संकलन करण्यात आला.महाद्वारासमोरच्या मोकळ्या जागेतील दगडे रचण्यात आली,
दिवसभर केलेल्या जागतिक वारसा साल्हेर मोहिमेत ११० हुन अधिक दुर्गसंवर्धाकांनी श्रमदानात सहभाग घेतला.

जागतिक वारसा टीम साल्हेर ची हवाई पाहणी करणार आहे. या पार्श्वभूमिवर साल्हेरच्या दुर्गसंवर्धक मोहीम घेण्यात आली.यावेळी किल्ल्याच्या बांधीव तट बांधणीजवळ गोलाकारबसून श्रावणी बच्छाव, योगेश कापसे यानीं साल्हेरच्या इतिहासावर विषयावर मार्गदर्शन केले, तर दुर्गसंवर्धन अभ्यासक राम खुर्दळ यांनी दुर्गसंवर्धनकार्याची व्याप्ती सांगितली, तर खंडू आहेर यांनी संवाद सत्राचे आभार मानले.तर संजय झारोळे यांनी मोहीम व्यवस्थापनात भोजन व्यवस्था सांभाळली,
दि २९ सप्टेंबर रोजी झालेल्या महादुर्ग संवर्धन महादुर्ग साल्हेर मोहिमेत साल्हेर किल्ला ढगानी व्यापलेला व सातत्याने सुरु असतानाही भर पावसात दुर्गसेवक यांनी माथ्यावरचे परशुराम मंदिराला भेट दिली.

साल्हेरच्या इतिहासाला उजाळा देतांना १६७२ साली साल्हेरच्या लढाईचे प्रसंग यावेळी उपस्थित दुर्ग सेवकाना सांगण्यात आले, मुघलं व मराठे यांच्यात झालेल्या तुंबळ युद्धात छत्रपतीं शिवरायांचा जिवलग असलेला सूर्यरावं काकडे हे साल्हेरच्या पायथ्याला धारातीर्थ पडले,प्रतापरावं गुजर, व मोरोपत पिंगळे यांच्या नेतृत्वात खुल्या मैदानावर मुघलांच्या हजारोच्या फौजेचा पराभव यावेळी केला, विजय मिळाला पण वीर सूर्यराव काकडे लढता लढता धारातीर्थ पडला,सूर्यरावं काकडेची समाधी स्थळी दुर्ग सेवकांनी फुले वाहून तेथील टाक्यातील आजूबाजूची काटेरी झूडप काढली,

या महादुर्ग संवर्धन मोहिमेत सहभागी दुर्ग संवर्धन संस्था,

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, नाशिक,
सकल मराठा परिवार, नाशिक,
संस्कृती दुर्गसंवर्धन, विल्होळी,
टीम देहेरगड, स्वराज्य कार्य
लोकमाध्यम विज्ञान व निसर्ग संस्था, नाशिक
राजा शिव छत्रपतीं परिवार, नाशिक
रौद्र शंभु परिवार, नाशिक,
हिंदवी स्वराज्य परिवार, बागलाण,
दुर्गसंवर्धन प्रतिष्टान, नाशिक,

अश्या ९ संस्थानी महावारसा मानाकन साल्हेर वर श्रमदानं केलं, यनिमित्ताने जिल्ह्यातील ६८ हुन अधिक दुर्गाची दुरवस्था दूर होण्यास मदत होईल,गडाचे मूलभूत प्रश्न समाजातील सर्व घटक, शासन, प्रशासनास कळतील त्यावर उपाय करणे सोयीचे होईल, त्यासाठीच नाशिक जिल्ह्यातील दुर्गसंवर्धन क्षेत्रातील अभ्यासू अनुभवीना सरकारने दुर्गसंवर्धन, वारसा संवर्धन समितीवर घ्यावे, परस्पर नियुक्त्या होऊ नये,असे राम खुर्दळ यांनी ठरावं मांडला तो एकमुखी सर्वांनी मंजूर केला,
यावेळी शिवव्याख्याते समाधान हेगडे पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून इतिहासाच्या अनेक घटना घडामोडी मांडल्या. प्रवासात सुद्धा साल्हेर मोहीम पोवाडे, दुर्ग गिते गायन झाले,
यावेळी पुरातत्व विभागाचे श्री. विजयकुमार धुमाळ, सचिन पगारे, दिलीप सोनवणे, सचिन कुलकर्णी, रोहन पगारे,यांचा ही मोहिमेत सहभाग मिळाला,
युवराज पवार, प्रा, सोमनाथ मुठाळ,विकास भोसले,,इतिहास अभ्यासक रविद्र पाटील, पुरातत्व चे सहाय्यक संचालक अमोल गोटे, व नाणी संशोधक चेतन राजापूरकर यांचे ही मार्गदर्शन व्यवस्थापनात मार्गदर्शन मिळाले,

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427