सातपूर-गंगापूर भाजपचा बालेकिल्ला; सीमा हिरे यांच्या विजयाचा निर्धार

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आ. सीमा महेश हिरे यांच्या विजयाचा निर्धार सातपूर, गंगापूर आणि शिवाजीनगर परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीतून व्यक्त केला आहे. रविवारच्या या रॅलीत प्रभाग क्रमांक १० व ११ मध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सीमा हिरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला.

खान्देश मराठा मंडळाचे सातपूर अध्यक्ष राजू पाटील, भाजपा मंडल अध्यक्ष भगवान काकड, माधुरी बोलकर, जीवन रायते, राजेश दराडे, भावना पवार यांसह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना “सातपूर परिसरातील शांतता आणि प्रगतीसाठी सीमा हिरे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडणे आवश्यक आहे,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, सर्वसामान्यांसाठी खंबीर उभ्या राहणाऱ्या सीमाताईंनी संपूर्ण मतदारसंघात विश्वासार्ह स्थान मिळवले आहे, त्यामुळे त्यांच्या विजयाची औपचारिकताच शिल्लक आहे.

रॅलीत रामहरी संभेराव, भिवानंद काळे, किरण देशमुख, दिलीप शिंदे, बाळासाहेब भोजने, सुरेंद्र अलई, बाळू हिरे, मनोज तांबे, संजय गायकवाड यांसह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427