निफाड: निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढत असून, आज शनिवार (दि. ३०) रोजी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा सात अंशांवर घसरल्याची नोंद झाली आहे. चालू हंगामातील हे नीचांकी तापमान असून द्राक्ष बागाईतदारांसाठी ही थंडी चिंतेचा विषय बनली आहे. घसरलेल्या तापमानामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबण्याची शक्यता आहे, तर परिपक्व द्राक्षमालाला तडे जाण्याचा धोका निर्माण […]
नाशिक: कांदा लागवड न करता पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्र दाखवून विमा उतरविल्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव आणि पाथर्डी या सात तालुक्यांतील तब्बल 7,241 शेतकऱ्यांनी 2,055.98 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड नसतानाही विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले. कृषी विभागाच्या तपासणीनंतर बनावट अर्ज रद्द करण्याच्या सुचनेमुळे […]
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीला मोठा विजय मिळाला असून, भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानात होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावरुन भाजप आणि इतर घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र, भाजपच्या १३२ जागांवरील विजयामुळे […]
नाशिक – संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त गणेशवाडी, पंचवटी येथील स्मारकास अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी फुले दाम्पत्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. संभाजी ब्रिगेडने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनाला खरा ‘शिक्षकदिन’ घोषित करण्याची मागणी केली. फुले यांनी समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवून शैक्षणिक क्रांती […]
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावाच्या हद्दीत टोमॅटो पिकात गांजाची आंतरपीक घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वडनेर भैरव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत २१५ किलो वजनाची व सुमारे ₹१३ लाख किमतीची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार […]
महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. पुण्यातील किमान तापमान 10 अंशांवर पोहोचल्याने थंडीने कहर केला आहे. बुधवारी शहरात निरभ्र आकाश असले तरी थंड वाऱ्यामुळे […]
येवला शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदोर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीची कोंडी वाढत आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर, संभाजीनगर-मालेगाव जोडणारा कन्नड घाट दुरुस्तीमुळे बंद असल्याने वाहतूक पूर्णतः येवला मार्गे वळवण्यात आली आहे. आज सकाळपासून महामार्गावर 4 तासांपासून वाहतूक ठप्प असून, रस्त्यावर वाहनांची प्रचंड रांग लागली आहे. यामुळे येवला शहरातील रहिवासी आणि प्रवासी […]
नाशिक: सुरगाणा तालुक्यातील बा-हे गावात दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 10 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास बा-हे येथील सुनिल राऊत यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाट आणि देवघरातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. चोरीत एकूण ₹13,76,775 किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला होता. घटनेनंतर बा-हे पोलीस ठाण्यात […]
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले. यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे […]
मुंबई : संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते. २६ नाव्हेंबर १९४९ रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. शासनाने विविध जिल्ह्यात […]