येवला शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदोर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीची कोंडी वाढत आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर, संभाजीनगर-मालेगाव जोडणारा कन्नड घाट दुरुस्तीमुळे बंद असल्याने वाहतूक पूर्णतः येवला मार्गे वळवण्यात आली आहे.
आज सकाळपासून महामार्गावर 4 तासांपासून वाहतूक ठप्प असून, रस्त्यावर वाहनांची प्रचंड रांग लागली आहे. यामुळे येवला शहरातील रहिवासी आणि प्रवासी दोघेही हैराण झाले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून कोंडीची परिस्थिती टिपण्यात आली असून, वाहतूक सुधारण्यासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले असले तरी नागरिकांच्या समस्यांचे समाधान अद्याप झालेले नाही.