नाशिक : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले.
यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह 15 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व ई-उपस्थित होते.
श्री. एस.चोक्कलिंगम यांनी जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात आलेला अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले.