नाशिक – भारतीय जनता पक्षाच्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विकासाच्या दिशेने घेतलेली ठोस पावले आणि ‘माझं नाशिक, माझी जबाबदारी’ या ब्रीदाचे कटाक्षाने पालन केल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये त्यांचा प्रभाव वाढत आहे. विविध समाजघटकांनी त्यांना समर्थनपत्रे देत त्यांची उमेदवारी जाहीरपणे समर्थित केली आहे. श्री संत सावतामाळी समाजमंदिराचे अध्यक्ष गोविंद विधाते यांच्या […]
नाशिक – “आता प्रस्थापित पक्षांना मतदानाचा वापर करायला देणार नाही, मध्य नाशिकमधून मुस्लीम आमदार निवडून आणण्यासाठी आणि जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे,” असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मुशीर सय्यद यांनी दलित-मुस्लीम समाजाला एकजूट ठेवण्याचे आवाहन केले. अशोका मार्गावरील जलसा हॉलमध्ये आयोजित मेळाव्यात सय्यद यांनी शिवसेना ठाकरे गट, भाजप, आणि महाविकास आघाडीवर […]
नाशिक – मालेगाव येथील नाशिक मर्चंट बँकेच्या शाखेत गेल्या १५-२० दिवसांत १२ बेरोजगार तरुणांच्या खात्यांवर १०० ते १२५ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून, त्यांची कागदपत्रे आणि सह्या घेऊन बनावट खाती उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिराज अहमद नावाच्या व्यक्तीने नोकरीचे आमिष देऊन आधार व […]
नाशिक – “ईव्हीएम हॅक करून निवडणूक जिंकून देतो,” अशी थेट ऑफर देत खंडणी मागणाऱ्या एका तरुणाला नाशिक पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. उ बा ठा.चे नाशिक मधील उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयात जाऊन भगवानसिंग चव्हाण नावाच्या आरोपीने आपली ओळख ‘ईव्हीएम हॅकर’ म्हणून दिली. त्याने निवडणूक जिंकण्यासाठी ४२ लाख रुपये मागितले. आणि त्वरित ५ लाख […]
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, ज्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील विविध पक्षांच्या गटांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा बघायला मिळत आहे नाशिक मध्य मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या देवयानी फरांदे, शिवसेना (ठाकरे गटाचे) वसंत गीते, आणि वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद हे तगडे उमेदवार स्पर्धेत आहेत. या मतदारसंघात […]
नाशिक जिल्ह्यातील तिरढे तालुका पेठ येथे नमस्ते नाशिक फाउंडेशनने कष्टकरी महिला, समाजातील दुर्लक्षित व गरजू शेतमजुरांसोबत एक अनोखी दिवाळी साजरी केली. “जिथे कमी तिथे आम्ही” या संकल्पनेवर चालणाऱ्या या संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या नेतृत्वात 100 हून अधिक गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. या साड्या मिळाल्यावर महिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद ही दिवाळीची खरी ओळख […]
नाशिक – विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. यानिमित्ताने महायुती व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले, आणि अखेर यशस्वी ठरले आहेत. विशेषतः नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी अर्ज मागे घेतला आहे. […]
नाशिक : मनुष्याने आपल्या जीवनात नेहमी श्रेष्ठ कर्म करत राहावे, कारण आपल्या कर्मांचे प्रतिबिंबच आपल्याला सुख-दुःख अनुभवायला लावते, असे विचार नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केले. दिवाळी भाऊबीज निमित्त नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात आयोजित कार्यक्रमात दीदीजींनी कर्माच्या गहन तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, […]
नाशिकरोडच्या आनंद उत्तम मित्र परिवाराच्या आयोजनात संविधान कराओके ग्रुप प्रस्तुत दिवाळी पाडव्यानिमित्त “सदाबहार सुमधुर मराठी-हिंदी गीतांची संगीतमय पहाट” या कार्यक्रमाने रसिकांना संगीताच्या सुरेल दुनियेत हरवून टाकले. विकास मंदिर शाळा, दत्तमंदिर रोड येथे झालेल्या या मैफिलीत, संविधान ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम गीतांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमात उत्तम जाधव, मायकल खरात, रुपाली तायडे, मीना […]
नाशिकमध्ये ब्रह्माकुमारी मेरी सेवा केंद्रात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी उपस्थितांना आशीर्वाद देत, जीवनात सदैव शुभभावना ठेवण्याचे महत्व स्पष्ट केले. “आपण इतरांना जे देतो, तेच आपल्याला परत मिळते,” असे सांगून दीदीजींनी प्रत्येकाने शुभेच्छा आणि शुभभावनेचे बीज मनात रुजवावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा […]