नाशिकरोडच्या आनंद उत्तम मित्र परिवाराच्या आयोजनात संविधान कराओके ग्रुप प्रस्तुत दिवाळी पाडव्यानिमित्त “सदाबहार सुमधुर मराठी-हिंदी गीतांची संगीतमय पहाट” या कार्यक्रमाने रसिकांना संगीताच्या सुरेल दुनियेत हरवून टाकले. विकास मंदिर शाळा, दत्तमंदिर रोड येथे झालेल्या या मैफिलीत, संविधान ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम गीतांनी वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमात उत्तम जाधव, मायकल खरात, रुपाली तायडे, मीना पाठक, संजय परमसागर, रितिका गायकवाड, वनिता आहेर, विनोद गोसावी, सुहास माळवे, अशोक महाजन, अनुपमा क्षीरसागर, सविता सहानी, राधिका गांगुर्डे, रमाकांत गायकवाड यांनी “नमो गौतमा,” “कानडा राजा पंढरीचा,” “चाफा बोलेना,” “अवघे गर्जे पंढरपूर,” “तोच चंद्रमा नभात” यांसारखी सुमधुर गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येक गाण्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद देत संगीतमय दिवाळी पहाटेचा आनंद लुटला.
संविधान कराओके क्लबचे संचालक राजन गायकवाड आणि मीनाताई गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ठाकरे व संजय परमसागर यांनी केले, तर पावसे चिराग यांनी ध्वनी व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद उत्तम मित्र परिवाराचे संस्थापक उत्तम पवार, अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, कार्याध्यक्ष दिलीप पाटील आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक प्रयत्न केले.