नाशिक – “ईव्हीएम हॅक करून निवडणूक जिंकून देतो,” अशी थेट ऑफर देत खंडणी मागणाऱ्या एका तरुणाला नाशिक पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. उ बा ठा.चे नाशिक मधील उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयात जाऊन भगवानसिंग चव्हाण नावाच्या आरोपीने आपली ओळख ‘ईव्हीएम हॅकर’ म्हणून दिली. त्याने निवडणूक जिंकण्यासाठी ४२ लाख रुपये मागितले. आणि त्वरित ५ लाख रुपये देण्याची धमकी दिली.
आरोपीने शिरसाठ यांना धमकी देत सांगितले की, “पैसे न दिल्यास मी माझ्या ओळखीतल्या लोकांमार्फत ईव्हीएम सेट करून तुमचा पराभव सुनिश्चित करीन.” घाबरलेल्या शिरसाठ यांनी तत्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या चार तासात आरोपीला ताब्यात घेतले.