google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

सिंहस्थ कुंभमेळामध्ये सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकारांसाठी सर्व सोई सुविधा युक्त स्वतंत्र कक्ष उभारण्याची मागणी

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन

नाशिक : जिल्हा मराठी पत्रकार संघ सलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळामध्ये सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकारांसाठी तपोवन, गंगा घाट व व त्र्यंबकेश्वर येथे सर्व सोई सुविधा युक्त स्वतंत्र कक्ष उभारणे बाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले.

नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा बाबत आढावा सुरू आहे. सर्व गोष्टींचा आढावा घेऊन कुंभमेळ्याचा आराखडा आखण्याची तयारी प्रशासन मार्फत सुरू असून या आराखड्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असणाऱ्या पत्रकारांनाही मुख्य स्थान देऊन पत्रकारांच्याही अडीअडचणी समजून घेऊन त्यांना योग्य त्या सोयी सुविधा युक्त कुंभमेळा पुरते एक अद्यावत पत्रकार भवन उभारून देणे बाबत नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, पृथ्वीवरचा श्रद्धेचा सगळ्यात मोठा दृश्य सोहळा म्हणजे कुंभमेळा. बारा वर्षांतून एकदाच नाशिक आणि त्र्यंबक क्षेत्री भरणारा सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक सोहळा राहिलेला नाही, तर तो आंतरराष्ट्रीय इव्हेन्ट झाला आहे. हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, इलाहबाद, उज्जैन आणि नाशिकमध्य़े भरतो. जेथे देश-विदेशातून अनेक भाविक येत असतात. दरम्यान 2026 मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. नाशिकचा कुंभमेळा सिंह राशीत येत असल्याने त्याला सिंहस्थ म्हटले जाते. यापर्वकाळात विविध आखाडे, खालसे, संप्रदाय, व विचार प्रवाह एकत्रित येऊन विचार मंथन करतात. म्हणूनच नाशिक आणि कुंभमेळा हे समीकरण धर्म, भक्ती, श्रद्धा अन् पवित्रतेचे प्रतीक बनले आहे. यावेळी सिहंस्थ ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 रोजी, 2 ऑगस्ट 2027 रोजी प्रथम शाही स्नान त्यानंतर 31 ऑगस्ट 2027 रोजी द्वितीय शाही स्नान, तर 12 सप्टेंबर 2027 रोजी तृतीय शाही स्नान आणि 24 सप्टेंबर 2027 रोजी सिहंस्थ समाप्ती असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे वृत्तसंकलनाची जबाबदारी ही सर्व माध्यम प्रतिनिधींची असते.

या भव्य दिव्य महोत्सवामध्ये पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असून येथे घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा वेध घेऊन तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करीत असतात सिंहस्थ कुंभमेळाचे वृत्त संकलन करण्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातील स्थानिक पत्रकार अग्रेसर असतातच परंतु देश विदेशातीलही पत्रकार मोठ्या संख्येने या मोठ्या महोत्सवाच्या बातमी संकलनासाठी नाशिक शहरात व जिल्ह्यात येत असतात म्हणून सिंहस्थ आराखड्यात पत्रकारांसाठी पण सोय सुविधा देण्यात याव्या तसेच साधू म्हणताना ज्याप्रकारे एक जागा उपलब्ध करून दिली जाते त्याचप्रमाणे सर्व माध्यमांच्या पत्रकारांसाठी एक स्वतंत्र सोयी सुविधा युक्त प्रेस क्लब किंवा पत्रकार मंडप उभारून द्यावा अशी मागणी आम्ही आमच्या नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून करीत आहोत.

हे निवेदन देताना जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष सुनीता पाटील व पंकज पाटील, समन्वयक विश्वास लचके, सदस्य दिनेश पगारे, पल्लवी शेटे, दिनेश भागवत, गोरख जाधव, भास्कर साळवे, स्वप्नील बागुल यांच्या सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळामध्ये सर्व माध्यम क्षेत्रातील पत्रकारांसाठी तपोवन, गंगा घाट व त्र्यंबकेश्वर येथे सर्व सोई सुविधा युक्त स्वतंत्र कक्ष उभारणे बाबत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन देताना नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व पत्रकार सदस्य

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *