नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय हालचाल झाली आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाने माजी महापौर दशरथ पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तिसऱ्या आघाडीची ही जागा स्वराज्य पक्षाकडे जाताच, नाशिक पश्चिममध्ये महायुती, महाविकास आघाडी, आणि तिसरी आघाडी यांच्यात तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे.
दशरथ पाटील यांच्या उमेदवारीने या मतदारसंघात नवे समीकरण निर्माण झाले आहे. यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच, मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले असून, सर्वच पक्षांनी आपल्या प्रचार मोहिमा अधिक जोरदारपणे सुरू केल्या आहेत.
आगामी निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघात तिरंगी सामना होणार असल्यामुळे या लढतीकडे राज्यभरात लक्ष लागले आहे.