पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, पालघर दौऱ्यावर

author
0 minutes, 0 seconds Read

शुक्रवारी महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघर दौऱ्यावर येत आहेत. मोदी सकाळी सुमारे ११ वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४’ ला संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी दीडच्या सुमारास पालघरमधील सिडको मैदानावर वाढवण बंदराच्या भूमिपूजनासह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील.

पंतप्रधान मोदी या मुंबई भेटीदरम्यान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) २०२४ च्या विशेष सत्राला संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स यांनी संयुक्तपणे या जीएफएफचे आयोजन केले आहे. देशभरातील तसेच जगातील अनेक देशांतून आलेले विविध धोरणकर्ते, नियामक, जेष्ठ बँकिंग तज्ञ, उद्योग क्षेत्रातील अगणी तसेच शिक्षण तज्ञ असे सुमारे ८०० वक्ते या परिषदेतील ३५० हून अधिक सत्रांना संबोधित करतील.

यानंतर पंतप्रधान मोदी डहाणूकडे वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी रवाना होतील. दुपारी दीड वाजता सुमारे ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. याचवेळी पंतप्रधान सुमारे १ हजार ५६० कोटी रुपयांच्या २१८ मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पायाभूत सुविधा वाढवून उत्पादकता वाढवणे हा या उपक्रमांचा उद्देश असून, यामुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

सोबतच, पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ३६० कोटी रुपये खर्चाच्या नॅशनल रोल आउट ऑफ व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीमचा म्हणजेच जहाजांच्या दरम्यान संपर्क आणि मदत यंत्रणा उभारण्याचा प्रारंभ करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत देशातील १३ किनारपट्टीवरील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यात कार्यरत यांत्रिकी तसेच मोटर बसवलेल्या जहाजांवर टप्प्याटप्प्याने १ लाख ट्रान्सपाँडर बसवण्यात येणार आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427