जेष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या पत्नी व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री कै.सौ. रोहिणी प्रकाश वाजे वय ८१ वर्ष यांचे दुःखद निधन झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सिन्नर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू त्यांच्यावरील उपचारांना दाद मिळत नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी संगमनेर नाका स्मशानभूमी सिन्नर येथे दुपारी ४.०० वाजता होणार आहे.