नाशिक : नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका सुलभतेने प्राप्त होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे.
यशवंत पवार यांनी नुकतेच नवनियुक्त जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा केली आणि अधिस्वीकृतीसाठी अर्ज भरताना योग्य मार्गदर्शन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. याशिवाय, त्यांनी ज्येष्ठ पत्रकारांना सन्मानपूर्वक पेंशन देण्याची मागणी केली आणि व्हीव्हीआयपी दौर्यांमध्ये सर्व पत्रकारांना पासेस दिले जावेत असेही सुचवले.
जिल्हा माहिती अधिकारी गोपाळराव साळुंखे यांनी यावेळी शहर आणि ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या भेटीवेळी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे, नाशिक तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी, आणि सरचिटणीस संजय परदेशी उपस्थित होते.