google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक:- पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर हॉस्पिटलच्याच माजी पीआरओच्या पतीने आर्थिक वादातून जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राजेंद्र चंद्रकांत मोरे असे हल्लेखोराचे नाव असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, की डॉ. राठी यांच्याकडे रोहिणी राजेंद्र मोरे या पीआरओ म्हणून काम करीत होत्या. सन 2022 मध्ये डॉ. राठी यांची रोहिणी यांचे पती राजेंद्र मोरे यांच्यासमवेत ओळख झाली. काही काळानंतर त्यांनी मोरे यांच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरात एका जमिनीचा व्यवहार केला होता.गत दीड वर्षात डॉ. राठी यांनी मोरेला अनेक वेळा व्यवहारापोटी पैसे दिले होते. या पैशांसाठी राठी यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता.दरम्यान, राठी यांनी रोहिणी मोरे यांना कामावरून काढून टाकले होते. डॉक्टर आपली बाहेर बदनामी करीत आहेत, असा संशय आल्याने राजेंद्र मोरे याच्या मनात डॉक्टरांविषयी प्रचंड राग निर्माण झाला. काल रात्री तो डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आला. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना त्यांचे शाब्दिक वाद झाले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *