google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

अशोकस्तंभावर उभारणार छत्रपतींची ६५ फुटी मूर्ती २२फूट रुंदी ७ टन वजनाची भव्य मूर्ती

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक :- अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळातर्फे यंदाही सोमवारी (दि. १९) फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या शिवजन्मोत्सव मंडळातर्फे देखावा उभारणी कामाला नुकताच विधिवत पूजनाने प्रारंभ करण्यात आला.

मंडळातर्फे यंदा ६५ फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारली जाणार आहे. शिवाजी महाराज मूर्तीच्या एका हातात ४१ फूट उंचीचा राजदंड तर दुसऱ्या हातात ३५ फुटी तलवार असा देखावा साकारण्यात येणार आहे, अशी माहिती अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळातर्फे देण्यात आली.

शिवजन्मोत्सव व्यासपीठाचाभूमिपूजन सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार असून, शिवजन्मोत्सवानिमित्त संपूर्ण अशोकस्तंभ परिसरात सजावट करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन तसेच शिव आरती करत ढोल पथक व वाद्यवृंदात फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. मुख्य शिवजन्मोत्सव दिवशी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अशोकस्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे, अध्यक्ष समीर व्यवहारे, उपाध्यक्ष हर्षद निकम, वैभव वीर यांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *