google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

येत्या पंधरा दिवसात कांद्यावरील निर्यात बंदी उठवा व शेतीमालाला हमीभाव द्या अन्यथा जन आंदोलनाला प्रशासनाने सामोरे जा – करण गायकर

author
0 minutes, 0 seconds Read

येवला :- छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आज येवला तहसील वर शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
येवला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूत छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वा मध्ये सदर मोर्चा विंचूर चौफुली ते येवला तहसील कार्यालय पायी मोर्चा काढत केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
येवला तहसील कार्यालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या सरकार विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली या घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला होता. यावेळी कांद्यावरील निर्यात बंदी उठवा अन्यथा खुर्ची खाली करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोकं वरती पाय, शेतकरी एकजुटीचा विजय असो, जय जवान जय किसान या घोषणा देत केंद्र सरकार व राज्य सरकार चा निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्र सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांवर अन्याय करत असून कांद्याचा मोठ्या प्रमाणात साठा असतानाही चुकीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून कांदा उत्पादन कमी असल्यामुळे निर्यात बंदी उठवता येणार नाही हे जे काही धोरण केंद्र सरकारने घेतले आहे ते शेतकरी विरोधी आहे.
केंद्र सरकार त्या शेती मालावर निर्यात बंदी करून हक्काचे पैसे मिळवण्यापासून शेतकरी बांधवांना वंचित ठेवण्याच काम करत आहे. ज्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही त्यावेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देऊन त्यांचं होणारे नुकसान टाळले पाहिजे, हे सरकार शेतकरी बांधवां बाबत सकारात्मक नसल्याने आज राज्य व देशभरात हजारोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहे,शेती व्यवसाय करून स्वतःचे कुटुंब जगविने देखील शेतकऱ्यांना कठीण झाले आहे त्याला एकमेव कारण म्हणजे केंद्र व राज्य सरकारचे शेती विषयी चुकीचे धोरण आहे या सगळ्या गोष्टींना तात्काळ उपाय योजना जर केल्या नाही तर शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तात्काळ शेतीमालाला हमीभाव द्यावा व कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी.


शेतकऱ्याला दोन पैसे जास्त कसे मिळतील या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने पाऊल उचलले पाहिजे याच भावना आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे मांडत असल्याचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले.
यावेळी येवला तहसीलदार श्री आबासाहेब महाजन हे निवेदन घ्यायला आल्यानंतर संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन द्यायचं नाही असा निर्णय घेऊन यापूर्वी अनेक वेळा आम्ही निवेदन दिली वेळ प्रसंगी उपोषण देखील केली परंतु तुम्ही शासन स्तरावर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा भावना पोहोचवत नसल्याने आज निवेदन न देता निष्क्रिय प्रशासनाचा आम्ही निषेध करत येत्या पंधरा दिवसात जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या मध्ये
१) केंद्र सरकार मार्फत ७ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला ती निर्यात बंदी तातडीने उठवावी.२) १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधी मधील प्रोत्साहन पर कांदा अनुदानाची उर्वरित रक्कम ही एक रक्कमी त्वरित देण्यात यावी.
३) ६ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने घेतलेल्या अविचारी निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव हे ५००० रुपये वरून घसरून थेट २००० रू क्विंटल वर आले त्यामुळे प्रती क्विंटल ३००० रुपये इतकी नुकसान भरपाई केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.४) कांदा,कापूस,सोयाबीन,मका यां पिकांना रास्त भाव देण्यात यावा.५) शेतकऱ्यांना रात्रीच्या ऐवजी दिवसा वीजपुरवठा द्यावा
६) पिक विम्याची मदत कुठल्याही अटी शर्तींना टाकता थेट पंचनामे करून शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करावी.
या मागण्यावर सकारात्मक निर्णय न घेतल्यास छावा क्रांतिवीर सेना व शेतकरी बांधवांच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे केल्या जाईल व त्या आंदोलनात होणारे जे काही परिणाम असतील त्यास आपण व आपले शासन जबाबदार असेल असा इशारा येवला तहसीलदारांना निवेदन न देता संघटनेच्या वतीने देण्यात आला.
या मोर्चामध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,शिवाजी मोरे,शिवा तेलंग, विजय वाहुळे,नवनाथ शिंदे,किरण डोखे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज जराड,जिल्हाप्रमुख आशिष हिर,ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ, ग्रामीण जिल्हा संघटक गोरख संत,गिरीश आहेर,वैभव दळवी, किरण वाघ,योगेश पाटील,विकास काळे,मनोरमा पाटील,संगीता सुर्यवंशी,भारत पिंगळे, करण शिंदे, निंबा फडताळे,दिनेश नरवडे,ज्ञानेश्वर कोटकर,संदीप फडोळ, सागर जाधव,शिवम देशमुख,विकास गुळवे,दादासाहेब जोगदंड, मयूर पवार,वैभव वडजे,हर्षल पवार, राजाभाऊ खरात,जयेश मोरे, सागर फडोळ,रेखा पाटील मीनाक्षी पाटील,संगीता वाघ, रूपाली काकडे, दिपाली लोखंडे, सुवर्णा शिंदे,तेजस वाघ निखिल पवार,प्रफुल गायकवाड, गोरख कोटमे,संदीप जाधव, संतोष कदम, सचिन जाधव,प्रवीण कदम, विजय मोरे, जालिंदर मेंडकर, वाल्मीक पुरकर,विलास डोमसे, भरत पुरकर,कैलास कदम, श्रावण देवरे,संदीप शिंदे,विजय चव्हाण संदीप पवार आदी सहभागी झाले होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *