नाशिक – विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. यानिमित्ताने महायुती व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले, आणि अखेर यशस्वी ठरले आहेत. विशेषतः नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी अर्ज मागे घेतला आहे. […]
नाशिक : मनुष्याने आपल्या जीवनात नेहमी श्रेष्ठ कर्म करत राहावे, कारण आपल्या कर्मांचे प्रतिबिंबच आपल्याला सुख-दुःख अनुभवायला लावते, असे विचार नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी व्यक्त केले. दिवाळी भाऊबीज निमित्त नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात आयोजित कार्यक्रमात दीदीजींनी कर्माच्या गहन तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, […]
नाशिकरोडच्या आनंद उत्तम मित्र परिवाराच्या आयोजनात संविधान कराओके ग्रुप प्रस्तुत दिवाळी पाडव्यानिमित्त “सदाबहार सुमधुर मराठी-हिंदी गीतांची संगीतमय पहाट” या कार्यक्रमाने रसिकांना संगीताच्या सुरेल दुनियेत हरवून टाकले. विकास मंदिर शाळा, दत्तमंदिर रोड येथे झालेल्या या मैफिलीत, संविधान ग्रुपच्या कलाकारांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक अप्रतिम गीतांनी वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमात उत्तम जाधव, मायकल खरात, रुपाली तायडे, मीना […]
नाशिकमध्ये ब्रह्माकुमारी मेरी सेवा केंद्रात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी उपस्थितांना आशीर्वाद देत, जीवनात सदैव शुभभावना ठेवण्याचे महत्व स्पष्ट केले. “आपण इतरांना जे देतो, तेच आपल्याला परत मिळते,” असे सांगून दीदीजींनी प्रत्येकाने शुभेच्छा आणि शुभभावनेचे बीज मनात रुजवावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा […]
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पोषक वातावरण असून, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जागा निवडून येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे व्यक्त केला. माघारीच्या आदल्या दिवशी नाशिकमधील तीनही विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाजन यांनी विद्यमान आमदार, उमेदवार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून नाराजी […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर समीर खान यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवाब मलिक यांनी सोशल मिडिया (एक्स) अकाऊंटवरून ही दुःखद माहिती दिली […]
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार सध्या मैदानात उतरले आहेत. प्रचाराचा वेग वाढवण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यासाठी तपोवन येथील मैदानाची चाचपणी सुरू असून, महायुती पदाधिकाऱ्यांनी सभास्थळांची पाहणी केली आहे. पोलिसांच्या विशेष शाखेने यासंबंधित कार्यवाही आरंभली असून नाशिक शहर पोलिसांनीही गोपनीय माहिती संकलनास सुरुवात केली आहे. नाशिक […]
दिवाळीच्या सणात नागरिकांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांवरही आर्थिक भार वाढणार आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर परिणाम होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५६ रुपये, तर […]
पुणे वृत्त :- पुण्यातील स्वराज्य भवन येथे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांची भेट घेऊन नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकीत विजयाचे आशीर्वाद घेतले.नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी देऊन जनसेवेची संधी उपलब्ध करून दिली,याबद्दल मी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्य पक्षाच्या सर्व […]
वृत्त . ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जय शंभुराजे परिवार, महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाच्या वतीने किल्ले विश्रामगड येथे भव्य दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी दीपांच्या प्रकाशात किल्ला विश्रामगड उजळून निघाला, ज्यामुळे उपस्थित शिवप्रेमींना एक अद्वितीय दृश्य अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाला उपस्थित आदित्य शिंदे, एकनाथ करमोडकर, कृष्णा झनकर, भरत झनकर, आणि संकेत ठोसर यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन […]