दिवाळीच्या सणात नागरिकांच्या खिशाला महागाईचा झटका बसला आहे. आजपासून (१ नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे सणासुदीच्या काळात अनेक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांवरही आर्थिक भार वाढणार आहे.
१९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरामुळे देशभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यवसायांवर परिणाम होणार आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत १५६ रुपये, तर मुंबईत १५६.५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे अन्नधान्य आणि अन्य सेवांच्या किमतीही वाढू शकतात.
घरगुती वापराच्या १४ किलो गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. मात्र, व्यावसायिक दरांमधील वाढ आणि वाढत्या इंधन दरांमुळे विमान प्रवासही महाग होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सोबतच एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) च्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा थेट परिणाम विमान भाड्यात होऊ शकतो.
गेल्या चार महिन्यांत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये तब्बल १५० रुपयांहून अधिक वाढ झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.