नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार सध्या मैदानात उतरले आहेत. प्रचाराचा वेग वाढवण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. यासाठी तपोवन येथील मैदानाची चाचपणी सुरू असून, महायुती पदाधिकाऱ्यांनी सभास्थळांची पाहणी केली आहे.
पोलिसांच्या विशेष शाखेने यासंबंधित कार्यवाही आरंभली असून नाशिक शहर पोलिसांनीही गोपनीय माहिती संकलनास सुरुवात केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस देखील प्रत्येक घडामोडींवर सतर्क नजर ठेवून आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत पोलिस बंदोबस्ताचे व्यापक नियोजन हाती घेण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात आधीच अतिरिक्त कुमक दाखल झाली आहे. आयटीपीबीएफ, एसआरपीएफ, आणि सशस्त्र सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात असून, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी आणखी अतिरिक्त कुमक मागविण्याची शक्यता आहे.