बिटको महाविद्यलयात पालक शिक्षक सभा संपन्न . .

author
0 minutes, 0 seconds Read


नाशिकरोड:-” मित्र म्हणून पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये सुसंवाद व समन्वय व्हायला हवा. शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्या संवादातूनच गुणवत्ता वाढीस लागते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांची शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असुन विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहित करावे. आपल्या पाल्याचे मित्र मैत्रिणी कोण,गृहपाठ पूर्ण करतो की नाही याबाबत जागरूक करावे , मोबाईल महाविद्यालयात आणण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांना गणवेशत पाठवा. टू व्हीलर लायसन्स असेल तरच गाडी आणू द्या “असे मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यलयात गुरुवार दि. १९ सप्टेंबर रोजी सेमिनार हॉलमध्ये पालक शिक्षक सभा संपन्न झाली त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते . व्यासपीठावर उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे यासह पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे , पालक शिक्षक संघाच्या सचिव प्रा. सुहास माळवे,, समन्वयक दीपक पाटील,प्रा. सौ. हर्षदा तांदळे, लता चिकोडे आदि उपस्थित होते .प्रारंभी सुहास माळवे यांनी सभेचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयीन कामकाजाचा आढावा सादर करुन महाविद्यालयातील उपलब्ध सुसज्ज वर्ग ,प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक,क्रीडांगण व शिस्तीबाबत माहिती दिली. पालक प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करतांना दीपक पाटील यांनी नाशिकरोड कनिष्ठ महाविद्यालयात संस्कारीत विद्यार्थी घडतात असे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.सुजाता गायकवाड यांनी करुन आभार सौ. लता चिकोडे यांनी मानले. सभेस प्रा.हर्षदा तांदळे, योगेश काळे, राजेश होन, श्रीमती अनुराधा वाघ, जयश्री देवरे, शुभांगी पाटील, निलिमा कुलकर्णी,संजय परमसागर या शिक्षकांसह संदीप राजपूत, रिटा जोसेफ, सुलभा सुरजे, प्रिया केला , राम काटे, दत्ता गोसावी पालक प्रतिनिधी आदीं उपस्थित होते . सभेला पालक प्रतिनिधी व शिक्षक उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427