नाशिक :- मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणाच्या मागण्या मान्य करुण संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांचे उपोषण राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्वरित सोडवणे बाबतीत नाशिकच्या सकल मराठा समाज वतीने निवेदन आज दि २१
सप्टेंबर २०२४ रोजी नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले,
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे सकल मराठा समाजाच्या वतीने आपणास विनंती करत आहोत की, गरजवंत मराठ्यांच्या 50%च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षणासाठी संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या एक वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. आता पर्यंत मनोज दादा जरांगे पाटलांनी सहा वेळा आमरण उपोषण केले आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.आपण अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता आपण स्वतः पुढाकार घेऊन खालील मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
1)सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. 2)हैदराबाद गॅझेट लागू करावे, सातारा गॅझेट लागू करावे. बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करावे.
3)संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
4)कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे.
5) शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरु करावे.
6) EWS सह SEBC किंवा कुणबी OBC हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा.
7)मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सरकार म्हणून पुढाकार घ्यावा आणि विशेष अधिवेशन बोलवून मागण्या मान्य कराव्यात.विशेष अधिवेशन live करण्यात यावे जेणेकरून विरोधी पक्षांची भूमिका अखंड मराठा समाजाला कळेल, आणि मराठा आरक्षणाच्या विषयाचे राजकारण कोण करत आहे हे महाराष्ट्राला कळेल,आपण वरील विषय मार्गी लावले तर अखंड मराठा समाज तुमचे ऋण कधी विसरणार नाही. विरोधकांपेक्षा सत्तेवर आल्यावर तुम्ही मराठा समाजासाठी सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यासारखे विविध संस्थाच्या माध्यमातून मराठा समाजाचा विकास घडून येण्यासाठी प्रयत्न केला. आज रोजी अखंड मराठा समाजाला न्यायालयीन कक्षात टिकणारे आरक्षण मिळणे खूप गरजेचे आहे. आपण तिघांनी पुढाकार घेतला तर हे टिकणारे 50% च्या आतून OBC प्रवर्गातून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकते. संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील उपोषणाला बसून तीन दिवस झाले तरी सरकारने काहीही हालचाली सुरु केलेल्या दिसून येत नाहीत. तरी शासन म्हणून आपण त्वरित विशेष अधिवेशन बोलावे . त्यांच्या तब्बेतीचा विचार करता त्यांना उपोषणापासून फक्त सरकार मागण्या मान्य करून थांबवू शकते. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा आपणांस कळकळीची विनंती करत आहे की मागण्या आणि आरक्षण देऊन आपण हा प्रश्न कायमस्वरूपीचा निकालात काढावा. अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको,रेल्वे रोको ,सत्तेतल्या आणि विरोधी पक्षातील सरसकट नेत्यांना गाव बंदी,नेत्यांना घेराव, शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन,मराठा समाजातील मुले शाळा, कॉलेज वरती बहिष्कार टाकतील, तसेच मंत्रालयावर घंटा नाद पायी यात्रा काढण्यात येणार व जोपर्यंत आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला,
यावेळ सकल मराठा समाजावतीने नानासाहेब बच्छाव करण गायकर संजय फोटोळ त्रिलोक भामरे, राम निकम दत्ता कवडे राजेंद्र शेळके सुरज मालुंजकर गौरव गाजरे प्रितेश रायते विक्रम गायधनी अनिल आहेर रोहिणी उखाडे वंदना पाटील सुमन महाले अण्णा पिंपळे किरण डोके वैभव दळवी विलास रसाळ नितीन रोटे एडवोकेट स्वप्न राऊत स्वाती जाधव ज्ञानेश्वर सुरासे विकास रसाळ सह उपस्थित होते