नाशिकरोड :- ” तुझे सुरज कहू या चंदा, इतनी शक्ती हमे देना दाता, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, चंदा है तू मेरा सूरज है तू, आओ तुम्हे चांद पे ले जाये , एक प्यार का नगमा है, देख सकता हू मै, रोते रोते हसना सीखो, बडा नटखट है रे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, प्रभू तू दयाळू, ए जाते हुए लम्हो,तेरा मुझसे है पेहेले का नाता कोई , ” अशी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाणी गायकांनी सादर करून लहान दोस्तांची मने जिंकली
निमित्त होते ते नाशिकरोड येथील मुक्तिधाम जवळील अखिल भारतीय अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था संचलित गतिमंद, कर्णबधिर मुलांचे विकास मंदिर येथे संविधान कराओके टीमवतीने कराओके ट्रॅक गाण्यांवर आधारित सदाबहार हृदयस्पर्शी चित्रपट गीतांचे शनिवार दि.२१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी गायकांनी सादर केलेल्या गाण्यांचा विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी दाद देऊन मनस्वी आनंद घेतला.कार्यक्रमाचा प्रारंभी बुद्धमूर्ती समोर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करण्यात येऊन सुरुवात करण्यात आली . या संगीत रजनी कार्यक्रमाचे संयोजन राजन गायकवाड व मीनाताई गांगुर्डे यांनी केले होते . स्वतःराजन गायकवाड यासह अशोक महाजन , संजय परमसागर, शैलेश सोनार, सचिन पवार, मीना पाठक, रूपाली तायडे, मायकेल खरात, अनुपमा क्षीरसागर, गोविंद भोळे, विनोद गोसावी, चंद्रकांत लोंढे, संजय दुलगज , शिल्पा पगारे, राधिका गांगुर्डे, सोनिया पाटील यांनी विविध गाजलेली हिंदी व मराठी गाणी सादर केली. कार्यक्रमास अध्यक्ष पी. एस बॅनर्जी ( रिजनल डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ अँड एम्प्लॉयमेंट ) परिघा सामाजिक संस्थेच्या प्रेसिडेंट मीनाक्षी पवार, सौ निकिता चिमणकर, डॉ. राकेश गावित, डॉ. व्ही. जी. पेंढारकर, प्रकाश पगारे, सुभाष बोराडे, शैलेश ढगे, रोशन अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकला मगर, धर्मा सोनवणे यांनी केले तर आभार सचिव डॉ.सुहासिनी घोडके यांनी मानले . सर्व उपस्थितांचे आभार राजन गायकवाड यांनी मानले . सीएनपीचे निवृत्त अधिकारी मनोज चिमणकर यांचा वाढदिवस विकास मंदिराच्या विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला .