नाशिकरोड:- संविधान कराओके टीमवतीने आयोजित केलेल्या ‘श्रावणी हंगामा रजनी’ कार्यक्रमाने नाशिकरोडच्या रसिक श्रोतृवर्गाची मने जिंकली. या संगीतमय सायंकाळी एकाहून एक सरस हृदयस्पर्शी अजरामर गाण्यांनी वातावरणाला एक नव्या उंचीवर नेले. “बरसो रे मेघा”, “मेरे नैना सावन भादो”, “ओ सजना बरखा बहार आयी”, “रिमझिम गिरे सावन”, आणि “गारवा वाऱ्यावर भिरभीर” यांसारख्या अनेक गीतांनी श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
इंडिया सिक्युरिटी प्रेस जिमखाना हॉल, नाशिकरोड येथे रविवार, दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या या कार्यक्रमात, बुद्धमूर्ती समोर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली. शिल्पा पगारे यांच्या ‘प्रथम नमो गौतमा’ या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या संगीत रजनीचे संयोजन राजन गायकवाड आणि मीनाताई गांगुर्डे यांनी केले होते.
या कार्यक्रमात राजन गायकवाड, सुनील मराठे, गौतम भदाणे, संजय परमसागर, भरत भोई, अशोक दिवे, मीना पाठक, अस्मिता गादेकर, अनुपमा क्षीरसागर, वैशाली सूर्यवंशी, सुरेंद्रनाथ सोनार, जयवंत गांगुर्डे, अशोक महाजन, राधिका गांगुर्डे, गोविंद भोळे, विनोद गोसावी, प्रीतम आमेसर, सुदेश आमेसर, नितीन केदारे, संजय दुलगज, शैलजा सोनार, माधवी भटनागर यांनी विविध गाजलेली सोलो, डुएट हिंदी व मराठी पाऊस गाणी सादर केली.
कार्यक्रमात परिघा सामाजिक संस्थेच्या प्रेसिडेंट मीनाक्षी पवार, सीएनपी जनरल सेक्रेटरी मनोज चिमणकर, सुभाष बोराडे, शरद मोरे सर, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, रोशन अहिरे – मालेगाव आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वनी व्यवस्थापन कैलास काळे यांनी उत्तम प्रकारे केले. सूत्रसंचालन संजय परमसागर व माधवी भटनागर यांनी केले. शिल्पा पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोहन पवार यांनी उत्कृष्ट पाच गायक, गायिकांना बक्षिसे देऊन कलाकारांचा आनंद द्विगुणीत केला. उपस्थित सर्व अतिथी व खचाखच भरलेल्या हॉलमधील रसिक श्रोत्यांनी गायकांनी सादर केलेल्या गाण्यांना उस्फूर्त दाद देऊन पाऊस संगीत रजनीचा आनंद घेतला.