टीम देहेरगड संस्थेच्या ४ थ्या वर्धापन दिनाला विविध दुर्गसंवर्धन संस्था व राबत्या दुर्गसंवर्धकांचे सन्मान,
नाशिक :- आपल्या दुर्दैम्य इच्छाशक्तीने,चार वर्षांच्या अपार मेहनतीने अज्ञात असलेल्या देहरगडाच्या मातीत झूडपात दडलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणाऱ्या टीम देहेरगड या दुर्गसंवर्धन मोहिमेचा चौथा वर्धापन दिन नाशिकला मोठया उत्साहात झाला.यावेळी संस्थेने केलेल्या कष्टप्रद कामाच्या चित्रफीत दाखवण्यात आली,व जिल्ह्यातील विविध दुर्गसंवर्धन संस्थांचा व राबत्या व्यक्तींचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान (दि २२ सप्टेंबर २०२४ रोजी) करण्यात आला.
टीम देहेरगड या संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन नाशिकच्या डीजीपी नगर मधील निरामय जेष्ठ नागरिक संघाच्या हॉल मध्ये २२ सप्टेंबर रोजी झाला, या वर्धापन दिनाच्या अध्यक्षस्थानी वनविभाग पूर्व चे वनपाल अशोक काळे हे होते, तर दुर्गसंवर्धन विषयावर व्याख्याते म्हणून दुर्गअभ्यासक राम खुर्दळ, सकल मराठा परिवारचे खंडू आहेर, जेष्ठ दुर्गसंवर्धक संजय झारोळे यासह सुशील पाटील, सुशांत लोहट उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला किल्ले देहेर गडाच्या मोहिमेतील माहिती शांताराम कदम यांनी दिली.त्यानंतर दिपप्रज्वलन,शिवगारद, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर यावेळी “दुर्गसंवर्धन कार्य” विषयावर दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की,टीम देहेरगड सारख्या अंधारात असलेल्या गडाला बोलक करणारे असामान्य काम टीम देहेर गड या संस्थेने सातत्याने केले,दुर्गसंवर्धन कार्यात अभ्यास असावा लागतो, उठ सुठ बिनधास्त ते करू नये, त्यासाठी अभ्यास पुरातन बांधणी तंत्र व छत्रपतीं शिवरायांच्या अज्ञापत्र माहिती असायला हवं,दुर्गसंवर्धन कार्य निष्काम कर्मयोगाच काम यात त्याग व अपार कष्ट आहे,मात्र केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच दुर्गसंस्था यावर अपार काम करतात, व लुप्त झालेला सह्याद्रीतील गडाचा तो वारसा बोलका करतात, छत्रपतींच्या इतिहासाबद्दल नावाने राज्यात कितीक वाद रोज घडवले जातात,मात्र या वादाने हाती काय लागणार?घरात बसून वाद करणाऱ्यांनी छत्रपतींची खरीखुरी सह्याद्रीतील स्मारके गडकिल्ले कसे आहेत बघावे,त्यांची आजची अवस्था दूर करण्यासाठी पुढ या, केवळ उत्सवाने राजांची कृपा होणार नाही, मोडकळीस उध्वस्त भग्न दुर्गाचे अस्तित्व वाचवा महाराजांना ही हेवा वाटेल असे काम अभ्यासात्मक करा, अहो हाच राज्यांना मावळ्यांना मुजरा असेल हेच काम दुर्गसंवर्धन संस्था करतात मात्र समाज, सरकार प्रशासन यांना फार समजून घेत नाही निवडक मंडळीना परस्पर समित्यावार घेतलं जात हे दुर्दैव नाही तर काय? असा सवाल त्यांनी व्यक्त केला.
त्यानंतर अध्यक्षस्थानी असलेले वनपाल आशोक काळे यांनी वन विभागात काम करताना रामशेज व देहरीगडाचे दुर्गसंवर्धन कार्य मला जवळून अनुभवता आले, शिवकार्य गडकोट टीम देहेर गड या मोहिमा करीत असलेल्या कामात मी दुर्गसेवक म्हणून तसेच वन पाल म्हणून राबत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे, वनवा निसर्ग व सह्याद्रीला लागलेलं ग्रहण आहे ते थांबवन्यासाठी ही आम्ही व दुर्गसंवर्धक जीव धोक्यात टाकून वनवा विझवतात,तूम्ही राबता हे राजे दुरून बघता तुमच्या कामाला खूप सदिच्छा,सकारात्मक राहा मी आपल्या सोबतच आहे, असे त्यांनी संगितले,
या दुर्गसंवर्धन संस्थांचा गौरवं :
शिवकार्य गडकोट संस्था,नाशिक,
सह्याद्री प्रतिष्टान, नाशिक,
शिवसंस्कृती बहू उद्देशीव संस्था, विल्होळी,
विशेष दुर्गसंवर्धक म्हणून सतीश पाटील, विष्णू अहिरराव, केतन गुंजाळ, सुशांत लोहट,शिवाजी धोंडगे, भारत पिंगळे, दुर्ग संवर्धन कार्यात राबणाऱ्याचा विशेष गौरवं करण्यात आला, यावेळी देहेर गड संस्थेच्या कामातील आठवणी मांडण्यात आल्या,
यावेळी शिवकार्य गडकोटचे भुषण औटे, संजय झारोळे,मयुरेश बिडवई, मनोज अहिरे, सह्याद्री प्रतिष्टान चे सचिन पाटील, शिव संस्कृतीचे विल्होळी येथील भाऊसाहेब डांगे, देहेरी गड संस्थेच्या दुर्ग संवर्धक यांच्या कुटुंबियांची व निरामय जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा वैशाली पिंगळे यासह अनेक दुर्गसेवक यावेळी उपस्थित होते, राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली,