नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंद्रनील जाधव याने नाशिक येथील यशवंत व्यायाम शाळेत झालेल्या शालेय जिल्हास्तर मल्लखांब स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच पार्थ सरोदे याने जिजामाता इंटरनॅशनल तरणतलाव नाशिकरोड येथे झालेल्या ५० मीटर फ्री स्टाईल ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक व १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक
स्पर्धेत सुयश प्राप्त केले. तसेच कु. मनस्वी खर्डे हिने २०० मी ब्रेस्ट स्ट्रोक, २०० मेडली व १०० मी बटरफ्लाय स्पर्धेत सुयश प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभल
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले.