जिल्ह्यातील ९ संस्था करणार अभ्यासपूर्ण दुर्गसंवर्धन मोहीम.
नाशिक :- यूनोस्कोच्या मानांकन नंतर बागलाण प्रांतातील उतुंग साल्हेर किल्ल्यावर नाशिक विभागाच्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून महास्वच्छता उपक्रम जोमाने सुरु आहे, याच निमित्ताने येत्या रविवारी दिनांक २९ सप्टेंबरला नाशिकच्या दुर्गसंवर्धन कार्यात राबणाऱ्या ९ दुर्गसंवर्धन संस्थांचे अभ्यासपूर्ण दुर्गसंवर्धन होणार आहे,या निमित्ताने या मोहिमेत सामील जिल्ह्यातील मध्यवर्ती संस्था म्हणून ओळख असलेल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या द्वि-शतकी मोहीम असल्याने साल्हेर मोहिमेत राबणाऱ्या प्रत्येक सहभागीना तसेच दुर्गसंवर्धन संस्थां व व्यक्तींना विशेष प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती या मोहिमेचे मार्गदर्शक राम खुर्दळ यांनी दिली आहे.
भारतातील सर्वात उंच असलेल्या डोंगरी किल्ल्याला जागतिक वारसा म्हणून मानांकन मिळाल्याने ६५ हुन अधिक दुर्गाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या किल्ल्याना या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. त्यानिमित्ताने हा दुर्लक्षित भग्न वारसा संवर्धन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किल्ल्याची दशा बदलेल या आशेने दुर्गसंवर्धन महा मोहीम किल्ले साल्हेरवर होतं आहे. या मोहिमेचा हा आगळावेगळा उपक्रम असून दुर्गसंवर्धनाच्या अभ्यासंपूर्ण श्रमदानाच्या “जागतिक वारसा किल्ले साल्हेर महा दुर्गसंवर्धन मोहिमेत”जिल्ह्यातील २५ वर्षे दुर्गसंवर्धनाचा अनुभवं असलेल्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची द्वि शतकी मोहीम आहे,सोबतच सकल मराठा परिवार,स्वराज्यकार्य किल्ले देहेरगड मोहीम, राजा शिवछत्रपती परिवार, लोकमाध्यम संस्था,शिवदुर्गभ्रमती संस्था विल्होळी, हिंदवी स्वराज्य परिवार,
बागलाण,दुर्गसंवर्धन प्रतिष्टान,अश्या विविध संस्था साल्हेर महा दुर्ग संवर्धन संस्थेत सहभागी असतील, येत्या रविवारी २९ सप्टेंबरला या मोहिमेसाठी पहाटे ५ वाजता नाशिकच्या कोर्टासमोरील शिवतीर्थावरून सगळेच दुर्गसंवर्धक बसने सोबतच जाणार आहे,या मोहिमेसाठी किल्ल्यावर दुर्गगिते पोवाडे गायन ही केलं जाणार आहे,
या महा दुर्गसंवर्धन मोहिमेच्या संयोजनासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत केली आहे,ती खालीलप्रमाणे
साल्हेरगड वारसा नामांकन मोहीम
१) . मोहीम मार्गदर्शक टीम :
१. दुर्ग अभ्यासक प्रा. राम खुर्दळ सर
२. श्री. अमोल गोटे (पुरातत्व अधिकारी, नाशिक)
- प्रवास नियोजन
१. श्री खंडु आहेर - नाश्ता /भोजन नियोजन
१. श्री संजय झारोळे
२. श्री निलेश उदावंत - श्रमदान नियोजन /औजारे नियोजन
१. श्री बजरंग पवार
२. श्री विकास भोसले
३. श्री संजय झारोळे
४. श्री भुषण औटे पाटिल
५. श्री रविंद्र मुठाळ - फोटोग्राफी नियोजन टिम.
१. श्री विकास भोसले
२. चि. अतुल दवंगे
३. चि. श्रेयस झारोळे
४. श्री. निलेश उदावंत - मेडिकल टिम
१. डॉ. दिलीप मोहन
२. डॉ. सौ. ज्योती मोहन
३. डॉ. सोनवणे
४. डॉ. उन्हवणे