उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ राज्यस्तरीय मतदान जनजागृती अभियानाची दिमाखदार सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील […]

भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिकसाठी मतदानातून परिवर्तन घडवा – वसंत गिते

नाशिक – भाविकांचे शहर, औद्योगिक केंद्र, आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या दशकात गुन्हेगारी, ड्रग्जचा विळखा, आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे नाशिककरांना अडचणीत आणले आहे. नाशिकला सुरक्षित, भयमुक्त, आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गिते यांनी केले. इंदिरानगरमधील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक […]

नाशिकचा सुवर्णकाळ की अंधकाराचा मार्ग? – आदित्य ठाकरे यांची महायुती सरकारवर हल्लाबोल

नाशिक –“मी नाशिक दत्तक घेणार नाही, पण नाशिकचा विकास मात्र मोठ्या प्रमाणावर घडवणार आहे,” असे ठाम प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवननगर स्टेडियम, नवीन नाशिक येथे ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, येणारी विधानसभा निवडणूक ठरवेल की महाराष्ट्राचा मार्ग […]

विधानसभा निवडणूक 2024: नाशिक परिक्षेत्रात 49 कोटींचा अवैध मुद्देमाल जप्त..

नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात कडक सुरक्षा व्यवस्थापन करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि नाशिक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चेक पोस्ट आणि नियमित तपासणीद्वारे अवैध माल जप्त करण्यात येत आहे. आजवर 49 कोटी 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे, ज्यात 6 कोटी 53 लाखांची रोख रक्कम, […]

“नाशिक पूर्वमध्ये तुतारीचा निनाद; ढोल-ताशांच्या गजरात राष्ट्रवादीच्या गणेश गीतेंच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन”

नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे मतदारांचा कौल मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश गीते यांनी पंचवटी विभागीय प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ आज ढोल-ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात संपन्न झाला. पंचवटी कारंजा येथील या कार्यालय शुभारंभाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांसह विविध समाजातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, ज्यामुळे हा सोहळा केवळ राजकीय […]

नाशिक मध्य मतदारसंघातहिंदूत्ववादाचाच विजय होणार,आ. देवयानी फरांदे यांचा विश्वास

नाशिक ( प्रतिनिधी)- हिंदूत्ववाद हा माझा स्वाभिमान आहे. ती माझी अस्मिता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, त्याप्रमाणे हिंदूत्व ही सर्वसमावेशक जीवनशैली आहे. यावर माझी अतीव श्रध्दा व निष्ठा असल्याचे प्रतिपादन प्रा. देवयानी फरांदे यांनी केले. मध्य नाशकात झालेल्या प्रचारफेरी दरम्यान त्या पत्रकारांशी बोलत होत्या.या निवडणुकीत भरघोस मते मिळून हिंदूत्ववादाचा विजय निश्चितपणे होणार असा विश्वासही प्रा. देवयानी […]

“नाशिक पूर्वचे महायुती उमेदवार आमदार राहुल ढिकले यांच्या प्रचार कार्यालयाचे गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन”

नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या निमाणी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी, ७ नोव्हेंबर रोजी, गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास उमेदवार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, अरुण पवार, सुनीता पिंगळे, हेमंत शेट्टी, प्रियांका […]

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; महाविकास आघाडीवरही भ्रष्टाचाराचे आरोप

नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधील जाहीर सभेत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. काँग्रेसवर जातीवादाचा धोकादायक खेळ खेळल्याचा आरोप करत मोदी म्हणाले, “काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी समाजातील लोकांना पुढे येताना पाहू शकत नाही.” मोदींनी नाशिकच्या विकासाचा मुद्दा मांडत भाजप महायुतीच्या सरकारने नाशिकसाठी विकासाच्या योजना राबवून रोजगाराच्या संधी […]

नाशिक : १२ दिवसांपासून बेपत्ता सराफ व्यावसायिकाचा शोध अधांतरी; शिंदे गावात अस्वस्थता

नाशिक – पुणे महामार्गावर असलेल्या शिंदे गावातील २७ वर्षीय सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे १२ दिवसांपासून बेपत्ता असल्याने संपूर्ण शिंदे गाव आणि नाशिक रोड परिसरात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस विभाग, सुशांतचे कुटुंबीय, मित्रपरिवार, आणि गावकरी त्याच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत असले, तरी अद्याप कोणताही ठोस धागादोरा लागलेला नाही. घटनाक्रम २७ ऑक्टोबरला […]

नाशिक: गोदाघाटावर छटपूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; उत्तर भारतीय बांधवांची प्रचंड गर्दी

नाशिक – कार्तिक चतुर्थी निमित्त उत्तर भारतीय बांधवांनी गोदाघाटावर आज सायंकाळी छटपूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करत श्रद्धाळूंनी नदीपात्रात उभे राहून छटमातेचे पूजन केले. गोदाघाटावरील गर्दीने सायंकाळनंतर पाय ठेवायलाही जागा नव्हती. यावेळी व्रतस्थ महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नदीत उभे राहून पूजन केले, तर विविध प्रकारच्या फळे व पूजासामुग्री सजवून अर्पण करण्यात […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427