कसमादे परिसरातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा रब्बी हंगाम निसर्गाच्या अवकाळी कोपाचा प्रतीक ठरला आहे. परतीच्या पावसाने आधीच शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीतून सावरून, मोठ्या आर्थिक ताणाखाली शेतकऱ्यांनी नवीन कांदा रोप लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाल्याने दुसऱ्यांदा लावलेले रोपही भक्षस्थानी पडले. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळपासून […]
नाशिक: सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर निमा इंडेक्स-24 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक प्रदर्शनाचा त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम इस्टेट येथे आज (६ डिसेंबर) मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यास दीपक बिल्डर्सचे चेअरमन दीपक चंदे, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जिंदाल सॉ लिमिटेडचे अध्यक्ष व्ही. चंद्रशेखरन आणि अनेक नामांकित उद्योजक व मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या भव्य […]
नाशिकरोड: गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पार पडलेल्या या सभेत प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. सामुदायिक बुद्धवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या […]
मनमाड शहरातील विवेकानंद नगरसह विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसांत सहा दुचाकी पेटवण्याच्या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून, पोलिसांनी तात्काळ तपास करून सागर जगताप नावाच्या तरुणाला अटक केली आहे. दारूच्या नशेत सागर जगतापने घराबाहेर उभ्या असलेल्या सहा मोटारसायकली पेटवल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. मनमाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल […]
श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क ३० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर कमी केल्याने नाशिकसह देशातील कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे श्रीलंकेत भारतीय कांद्याची निर्यात वाढण्याची शक्यता असून, शेतकरी आणि निर्यातदार यांना चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा आहे. दरवर्षी भारतातून श्रीलंकेत साधारणतः दीड ते दोन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होतो. मात्र, आयात शुल्कामुळे गेल्या काही […]
निफाड तालुक्यातील वाहेगाव येथे 20 वर्षीय रोहित लहाणू पवार याचा मृतदेह गोई नदीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित 3 नोव्हेंबर रोजी सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता. मात्र, त्यानंतर त्याचा कोणाशीही संपर्क झाला नाही. कुटुंबीयांनी माहिती दिल्यानंतर लासलगाव पोलिसांनी तपास सुरू केला. शोधादरम्यान, गोई नदीच्या काठावर त्याचे दप्तर सापडले. यानंतर नदीत […]
त्र्यंबकेश्वर, 4 डिसेंबर 2024 संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा पूर्वतयारीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यात्रा 25 जानेवारी 2025 रोजी होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच या यात्रेचे नियोजन व्यापक प्रमाणावर सुरू आहे. बैठकीत विविध सरकारी विभागांचे अधिकारी, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व […]
महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाने नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आशा पुन्हा जागवल्या आहेत. प्रस्तावित २३२ किमीचा नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वेमार्ग कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना देणारा ठरणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी नव्या सरकारकडून निधी व सुस्पष्ट निर्णय अपेक्षित आहे. दरम्यान, सरकारने नाशिक-सिन्नर-शिर्डी मार्गाचा पर्याय सुचवला होता, परंतु तिन्ही जिल्ह्यांतून झालेल्या तीव्र नाराजीमुळे पूर्वीचाच मार्ग […]
मुंबई : राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा रब्बी हंगाम २०२४ साठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन […]
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सिंधूचा विवाह राजस्थानच्या उदयपूर येथे २२ डिसेंबरला होणार असून २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. सिंधूचा होणारा जीवनसाथी व्यंकट दत्ता साई एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी जेएसडब्ल्यू, सोलर अॅपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले असून सध्या पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक […]