नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्रुनेई, दारुसलेम आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्रुनेईतील त्यांच्या प्रथम द्विपक्षीय भेटीविषयी माहिती दिली असून, या भेटीद्वारे 40 वर्षांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याचा हेतू असल्याचे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी ब्रुनेईमध्ये महामहिम सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सदस्यांसोबत बैठक घेतील. या भेटीद्वारे, ब्रुनेई […]
मुंबईच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित सात धरणांच्या पाणीसाठ्यात 97% वाढ झाली आहे, त्यामुळे शहरात पाणी कपातीचं संकट दूर झालं आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात भरपूर वाढ झाली असून, मुंबईला आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार नाही. 2 सप्टेंबर रोजी, सातही धरणांतील पाणीसाठ्याची नोंद घेण्यात आली. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, […]
तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या तुफान पावसामुळे आतापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये एकूण 31 जणांचा मृत्यू झाला असून, पूरस्थितीमुळे सुमारे साडे चार लाख लोकांना मोठा फटका बसला आहे. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतकार्यास गती देण्यात आली असून, […]
रायगड: गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच, रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे उत्सवाच्या तयारीवर पाणी पडेल की काय, अशी चिंता गणेशभक्तांमध्ये आहे. ऑगस्टमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. सध्या रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू असून, 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान साजरा […]
मुंबई: ऐन सणासुदीच्या काळात, गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्याच्या निषेधार्थ एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला असून, राज्यभरातील एसटी बस डेपो बंद असल्यामुळे प्रवासी ठप्प झाले आहेत. एसटी कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, यासह आर्थिक बाबी […]
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ताज्या बैठकीत, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील सुमारे 1,000 गावांना थेट फायदा होणार आहे. मनमाड ते इंदूर या 309 किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर 30 नवीन स्थानकांचे निर्माण होईल. उद्योगक्षेत्राला प्रोत्साहन हा प्रकल्प 2028-29 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट […]
नागपूर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ वितरण कार्यक्रमात दिली. रेशीमबाग […]
पाथर्डी शिवारातील सदाशिवनगर येथील कृष्णा प्राइड अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गुरूवारी (दि. २९) दुपारी विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. निशा मयूर नागरे (वय- ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महिलेचा पती बेपत्ता असून महिलेचा मोबाइल व कागदपत्रे घरात आढळून आली नाहीत. सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक […]
शुक्रवारी महाराष्ट्रातील मुंबई आणि पालघर दौऱ्यावर येत आहेत. मोदी सकाळी सुमारे ११ वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४’ ला संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी दीडच्या सुमारास पालघरमधील सिडको मैदानावर वाढवण बंदराच्या भूमिपूजनासह विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच पायाभरणी करतील. पंतप्रधान मोदी या मुंबई भेटीदरम्यान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) २०२४ […]
जेष्ठ नेते प्रकाश वाजे यांच्या पत्नी व खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री कै.सौ. रोहिणी प्रकाश वाजे वय ८१ वर्ष यांचे दुःखद निधन झाले. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सिन्नर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू त्यांच्यावरील उपचारांना दाद मिळत नव्हती. अखेर आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी संगमनेर नाका स्मशानभूमी सिन्नर […]