नाशिक: नाशिक जिल्हा महिला काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत जिल्हा अध्यक्षा वंदना पंडित पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस पक्षाने केलेल्या विविध योजना आणि संकल्पांची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सहकार्याने 2024 विधानसभा निवडणुकांसाठी या महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमध्ये महिलांसाठी वर्षाला 6 मोफत गॅस सिलेंडर, मोफत प्रवास, […]
आडगावमध्ये महायुतीचे उमेदवार ॲड. राहुल ढिकले यांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यात स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांनी भूसंपादनात स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली. त्यांनी ठाम शब्दात सांगितले की, स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण न घेता बाहेरील धनाढ्य लोकांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांना नडणाऱ्यांना आडगावकर जागा दाखवतील. आडगावातील मारुती मंदिरापासून या रॅलीची सुरुवात […]
शनिवार, ९ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता मुंबईहून नांदेडला जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस कसारा स्थानकाजवळील सिग्नलजवळ उभी असताना एका बोगीच्या खाली अचानक आग लागली. आग लागताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. रेल्वे प्रशासनाच्या त्वरित कारवाईमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेचे नेमके कारण असे की, नंदिग्राम एक्सप्रेस एका सिग्नलजवळ उभी असताना एका […]
नाशिक :- नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारार्थ तुपसाखरे लॉन्स येथे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात राऊत यांनी नाशिकसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांनी या निवडणुकीला महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महत्त्वपूर्ण ठरवत नाशिकमध्ये भगवा झेंडा फडकत राहावा, असे मत व्यक्त केले. यावेळी […]
नाशिक – नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी गुंडगिरी व दहशतीला रोखणे आवश्यक असून, या उद्देशाने मतदारांनी भाजप महायुतीच्या उमेदवार सीमा महेश हिरे यांना निवडून देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते मामा ठाकरे यांनी केले. आज सकाळी सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरातून सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. […]
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निमित्त मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत, मतदार जनजागृतीसाठी ‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय सुरुवात गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ‘ये पुढे मतदान कर’ या महाराष्ट्र मतदान गीताचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील […]
नाशिक – भाविकांचे शहर, औद्योगिक केंद्र, आणि शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये गेल्या दशकात गुन्हेगारी, ड्रग्जचा विळखा, आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यामुळे नाशिककरांना अडचणीत आणले आहे. नाशिकला सुरक्षित, भयमुक्त, आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांना आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गिते यांनी केले. इंदिरानगरमधील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक […]
नाशिक –“मी नाशिक दत्तक घेणार नाही, पण नाशिकचा विकास मात्र मोठ्या प्रमाणावर घडवणार आहे,” असे ठाम प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पवननगर स्टेडियम, नवीन नाशिक येथे ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, येणारी विधानसभा निवडणूक ठरवेल की महाराष्ट्राचा मार्ग […]
नाशिक – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रात कडक सुरक्षा व्यवस्थापन करण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि नाशिक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चेक पोस्ट आणि नियमित तपासणीद्वारे अवैध माल जप्त करण्यात येत आहे. आजवर 49 कोटी 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे, ज्यात 6 कोटी 53 लाखांची रोख रक्कम, […]
नाशिक :- नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे मतदारांचा कौल मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश गीते यांनी पंचवटी विभागीय प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ आज ढोल-ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात संपन्न झाला. पंचवटी कारंजा येथील या कार्यालय शुभारंभाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांसह विविध समाजातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, ज्यामुळे हा सोहळा केवळ राजकीय […]