रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री कालिका देवी मंदिरात उत्साहात संपन्न

नाशिक :- नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका माता नवरात्र उत्सवानिमित्त श्री कालिका देवी मंदिर संस्थान, शिवसह्याद्री प्रतिष्ठान, आणि अखिल भारतीय मराठा महासंघ, नाशिकच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री सुनिल ढिकले, सरचिटणीस ऍड. श्री नितिन ठाकरे, […]

“महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती शाळेतील स्वच्छता मोहिमेद्वारे साजरी”

पुणे प्रतिनिधी. मुसूडगे रमेश :- २ ऑक्टोबर २०२४ रोजी “राष्ट्रपिता महात्मा गांधी” आणि “भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री” यांच्या जयंतीनिमित्त अभिराज फाउंडेशनने दिव्यांग मुलांच्या शाळेत एक वेगळ्या स्वरूपात स्वच्छता अभियान राबवून व विशेष शपथ घेऊन हा दिवस साजरा केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता चव्हाण यांच्या नेतृत्वात दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या परिसराची स्वच्छता करून स्वच्छतेचा […]

नाशिक जिल्ह्यात यंदा २७ टक्के अधिक पावसामुळे जलसंकटावर मात

नाशिक: “जल है तो जीवन है” या उक्तीला यंदा खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यातील बळीराजाने अनुभवले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा वरुणराजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवत २७ टक्के अधिक पाऊस बरसवला आहे, ज्यामुळे सर्वच धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकरी बांधवांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला मोठे नुकसान होत असे, मात्र यावर्षी […]

बिटको महाविद्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमात गोखले एज्युकेशन संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महात्मा गांधींच्या […]

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई, दि. २ :  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त मेघदूत निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

इगतपुरी : भावली धरणात २४ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका २४ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव अतिक नाशिर खान असून, तो मुंबईच्या वर्सोवा येथील रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी अतिक आणि त्याचे तीन मित्र भावली धरणावर पोहण्यासाठी आले होते. धरणाच्या ओव्हर फ्लोमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने अतिक बुडाला. इगतपुरी पोलिसांना घटनेची माहिती […]

BRS पक्षाचा राष्ट्रवादीत विलय: शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मोठी राजकीय हालचाल

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय हालचाल घडत आहे. तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचा महाराष्ट्रातील गट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 6 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यात या विलयाची अधिकृत घोषणा होणार आहे. BRS पक्षाने महाराष्ट्रात 22 लाखांहून अधिक […]

संभाजी ब्रिगेडची इम्तियाज जलील व समर्थकांवर कठोर कारवाईची मागणी…

नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने खासदार इम्तियाज जलील आणि त्यांच्या समर्थकांवर तातडीने कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक यांना निवेदन देण्यात आले. जलील यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीदरम्यान, काही व्यक्तींनी छत्रपती संभाजीनगर येथील फलकांचे विद्रुपीकरण करून “छत्रपती संभाजी महाराज” यांच्या नावाच्या फलकाला काळे फासले, ज्यामुळे तणाव निर्माण […]

छत्रपती संभाजीनगर फलकाचे विद्रुपीकरण, AIMIM रॅलीमधील सहभागींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी

दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी AIMIM पक्षाच्या रॅलीदरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील “छत्रपती संभाजी महाराज” यांचे नाव असलेल्या फलकांवर काळे फासून विद्रुपीकरण करण्यात आले. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील या रॅलीतील जमावाने केलेल्या या कृत्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने या प्रकाराविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधितांवर तातडीने […]

अभिनेता गोविंदा जखमी; बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली… नेमकं घडलं काय

अभिनेता गोविंदा यांना चुकून गोळी लागल्याने जखमी झाल्याची घटना घडली आहे. क्रिटी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती हॅास्पिटल प्रशासनाने दिली आहे. गोविंदाच्या मॅनेजर शाही सिन्हा यांनी सांगितले की, गोविंदा कोलकात्याला पहाटे जाण्याच्या तयारीत असताना कपाटात बंदूक ठेवण्याच्या प्रयत्नात ती खाली पडली आणि चुकून गोळी सुटली गोविंदानेही याबाबत स्पष्टीकरण […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427