अवैध वाळू साठ्याप्रकरणी ९ कोटींचा दंड वसूल न केल्याबाबत तक्रार दाखल….

बुलढाणा :- बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील रहिवासी अंबादास सुगदेवराव पवार यांनी तहसील कार्यालय, भुसावळविरोधात एक गंभीर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पवार यांनी आरोप केला आहे की, तहसील कार्यालयाने अवैधरित्या वाळू साठा प्रकरणात ठोठावलेला ९ कोटी रुपयांचा दंड अद्याप वसूल केलेला नाही. पवार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार भुसावळ यांच्या […]

नाशिकमध्ये गणपती बाप्पाला वाजत गाजत उत्साहात निरोप

नाशिक :- नाशिक, 17 सप्टेंबर 2024 – आज नाशिकमध्ये गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला. अनंत चतुर्दशी निमित्त शहरातील विविध मंडळांनी वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगीत फुलांच्या वर्षावात गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या. भक्तांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांनी आकर्षक […]

पिंपरी चिंचवडमध्ये कलाकारांच्या हितासाठी महत्वाची बैठक संपन्न…

पुणे :- 15 सप्टेंबर 2024, रविवार रोजी पिंपरी चिंचवड येथील शिवाजी पार्क संभाजीनगरमधील हर्षधन विला येथे कलाकारांच्या हिताचे मुद्दे आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महिला कलाकारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर तसेच कलाकारांच्या उपजीविकेच्या प्रश्नांवर विशेष चर्चा झाली. या बैठकीचा मुख्य उद्देश्य सर्व कलाकारांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना […]

21 राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाला सर्वसाधारण विजेतेपद

नांदेड :- महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन महाराष्ट्र नांदेड जिल्हा जम्परोप असोसिएशन तथा शिवाजी वाकडे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या 21व्या राष्ट्रीय जम्परोप स्पर्धेचा बक्षीस समारंभ क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय नांदेड येथे संपन्न झाला या स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विजयपद महाराष्ट्र, द्वितीय मध्य प्रदेश तर तृतीय तमिळनाडू संघाने पटकावले या स्पर्धेचा पारितोषिक समारंभाला महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव […]

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन: निजामाच्या जोखडातून मुक्ततेचा इतिहास, शहीदांना आदरांजली

छत्रपती संभाजीनगर :- आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि गौरवात साजरा करण्यात आला. 17 सप्टेंबर 1948 रोजी, मराठवाडा भागाने हैदराबादच्या निजामाच्या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात प्रवेश केला होता. या ऐतिहासिक दिवसाने मराठवाड्यातील स्वातंत्र्याची लढाई यशस्वी करून देशाच्या एकात्मतेला बळ दिले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणाऱ्या शूर योद्ध्यांच्या बलिदानाला स्मरण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. औरंगाबादमध्ये […]

सिडकोतील आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार: गुन्हा अंतिम टप्प्यात…

सिडकोतील आरटीआय कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर दोन ते अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आला आहे. आरोपी अंकुश शेवाळे यांनी मानसिक त्रास देणाऱ्या जाधव यांचा खात्मा करण्यासाठी सराईत गुंड मयूर बेद याला भाडोत्री गोळीबार घडवण्यास सांगितले होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके […]

नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर कांद्याच्या भाववाढीमुळे पेच

कांद्याच्या दरात झपाट्यानं वाढ झाली असून, यामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात मूल्यात 550 डॉलर कपात केल्यानंतर निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर कमी केले आहे. यामुळे कांद्याच्या भावात 400 ते 500 रुपयांची वाढ झालेली आहे. आता, वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे नाफेड आणि प्रोड्यूसर कंपन्यांसाठी कांदा खरेदी करणे […]

देशभर सिमकार्ड खरेदीसाठी पेपरलेस पद्धतीची सुरूवात: ऑनलाईन KYC प्रक्रिया लागू

देशभरात झपाट्यानं होत असलेल्या बदलांमध्ये एक नवीन क्रांतिकारी बदल झाला आहे. आता सिमकार्ड खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने होणार आहे. दूरसंचार विभाग (DoT) ने यासंबंधीचे नवीन नियम जाहीर केले आहेत, ज्यामुळे सिमकार्ड खरेदीसाठी ग्राहकांना टेलिकॉम ऑपरेटरकडे जाऊन कागदपत्रं सादर करण्याची गरज नाही. नव्या नियमांनुसार: या नव्या पद्धतीमुळे ग्राहकांना कागदपत्रांसाठी कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही, […]

एसटी बस प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांशी संपर्क करण्याची सुविधा

मुंबई : एसटी बस प्रवासातील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी प्रशासनाने नवीन यंत्रणा सुरू केली आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीसाठी प्रवाशांना थेट आगार प्रमुखांना फोन करून संपर्क साधता येणार आहे. आता प्रत्येक एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित आगाराचे प्रमुख, स्थानक प्रमुख, आणि कार्यशाळा अधीक्षक यांचे दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित केले जातील. हे क्रमांक बसमध्ये दिलेल्या सूचनांसोबत […]

धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे यांचा सकारात्मक प्रयत्न

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे  यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427