शासकीय नोकरीचे आमिष: वडिलांची ८.३५ लाखांची फसवणूक

मुलाच्या शासकीय नोकरीसाठी वणवण करणाऱ्या एका वडिलांना तीन ठगांनी बनावट जॉईनिंग लेटर देऊन तब्बल ८ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हेमराज गंगाराम गायकवाड (४८, रा. ताहाराबाद, जि. नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. गायकवाड यांचा मुलगा एमएसडब्ल्यू आणि डी. एड शिक्षण पूर्ण करूनही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. […]

अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी

अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सनी उर्फ मोंटी रमेश दळवी (34) याला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे व त्यांच्या पथकाने महाकाली चौक, सिडको येथे संशयिताचा पाठलाग […]

“अशोक स्तंभावरील वाड्यात आग, प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ”

नाशिक :- नाशिक शहरातील ऐतिहासिक अशोक स्तंभावर स्थित एका जुन्या वाड्यात आज पहाटे पाच वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. प्रशासनानेही तातडीने उपाययोजना केल्यामुळे कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. वाडा अतिशय जुना असल्याने आग वेगाने पसरू शकली असती. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार, […]

नाशिक रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: हरवलेले 130 मोबाईल परत, किंमत 19.45 लाख

नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे मोठे यश संपादन केले आहे. सी.ई.आय.आर पोर्टलच्या सहाय्याने 2021 पासून हरविलेले एकूण 130 मोबाईल फोन, अंदाजे किंमत 19 लाख 45 हजार रुपये शोधून काढले आणि मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 श्रीमती मोनिका […]

दिल्लीकडे शेतकऱ्यांचा लढा: संयुक्त किसान मोर्चाचा आंदोलनाचा एल्गार

संयुक्त किसान मोर्चाने आपल्या मागण्यांसाठी दिल्लीमध्ये मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सोमवारी सकाळपासून नोएडामधून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढत निघाले, त्यामुळे नोएडामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. शेतकरी मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर पोलिस आणि आरएएफ तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली-उत्तर प्रदेशच्या प्रमुख सीमेवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष काळजी […]

नाशिक बसस्थानकात सोन्याची पोत लंपास; चोरट्यांची चलाखी

नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. शनिवारी (३० नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली असून, यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरेश तुकाराम रणसशिंग (रा. अंबाजीनगर, आरटीओ कॉर्नर, पंचवटी) हे आपल्या पत्नीसोबत सकाळी ११ च्या सुमारास महामार्ग बसस्थानकात आले होते. नाशिक-सोलापूर बसमध्ये बसत असताना अचानक गर्दी […]

नाशिक तापमान अपडेट: आठवडाभर थंडी कमी होणार, तापमानात वाढ

नाशिक शहरात तापमानाचा पारा कालच्या ८.५ अंशांवरून आज ३ अंशांनी वाढून ११.५ अंशांवर पोहोचला आहे, तर कमाल तापमान २८ अंशांवर स्थिर आहे. येत्या काही दिवसांत किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फिंजल’ चक्रीवादळ काल तामिळनाडूच्या पाँडिचेरीजवळ आदळल्यानंतर कमकुवत होत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. याचा […]

‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींमध्ये नेतृत्वगुणांचा विकास : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या […]

निफाडमध्ये थंडीचा कहर: पारा 7 अंशांवर, द्राक्ष उत्पादक संकटात

निफाड: निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढत असून, आज शनिवार (दि. ३०) रोजी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा सात अंशांवर घसरल्याची नोंद झाली आहे. चालू हंगामातील हे नीचांकी तापमान असून द्राक्ष बागाईतदारांसाठी ही थंडी चिंतेचा विषय बनली आहे. घसरलेल्या तापमानामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबण्याची शक्यता आहे, तर परिपक्व द्राक्षमालाला तडे जाण्याचा धोका निर्माण […]

2055 हेक्टरचा बनावट पीक विमा उघड; शासनाची 1.27 कोटींची बचत

नाशिक: कांदा लागवड न करता पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्त क्षेत्र दाखवून विमा उतरविल्याचा प्रकार कृषी विभागाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव आणि पाथर्डी या सात तालुक्यांतील तब्बल 7,241 शेतकऱ्यांनी 2,055.98 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड नसतानाही विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले. कृषी विभागाच्या तपासणीनंतर बनावट अर्ज रद्द करण्याच्या सुचनेमुळे […]


Notice: ob_end_flush(): Failed to send buffer of zlib output compression (0) in /home/dlafqdkz/public_html/wp-includes/functions.php on line 5427