तळोदा तालुक्यातील दलेलपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९ वर्षीय अनिल करमसिंग तडवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील हा परिसरातील पाचवा बळी असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कालीबेल येथील तडवी कुटुंबातील अनिल हा दलेलपूरजवळील शेतात वावरत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात अनिलच्या डोक्याला आणि तोंडाला […]
पूर्वतयारी आढावा बैठक मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथे देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांना आवश्यक त्या सोयी – सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करावयाच्या […]
राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने राबवलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असून त्यात मानधन वाढीची शक्यता आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेबाबत स्पष्टता देत महायुती सरकारच्या संकल्पपत्रातील आश्वासन पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे. मुनगंटीवार यांनी नमूद केले की, वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या कुटुंबातील महिलांना तसेच कर भरणाऱ्या महिलांना […]
मुलाच्या शासकीय नोकरीसाठी वणवण करणाऱ्या एका वडिलांना तीन ठगांनी बनावट जॉईनिंग लेटर देऊन तब्बल ८ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हेमराज गंगाराम गायकवाड (४८, रा. ताहाराबाद, जि. नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. गायकवाड यांचा मुलगा एमएसडब्ल्यू आणि डी. एड शिक्षण पूर्ण करूनही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. […]
अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सनी उर्फ मोंटी रमेश दळवी (34) याला गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे व त्यांच्या पथकाने महाकाली चौक, सिडको येथे संशयिताचा पाठलाग […]
नाशिक :- नाशिक शहरातील ऐतिहासिक अशोक स्तंभावर स्थित एका जुन्या वाड्यात आज पहाटे पाच वाजता अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. प्रशासनानेही तातडीने उपाययोजना केल्यामुळे कसल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. वाडा अतिशय जुना असल्याने आग वेगाने पसरू शकली असती. मात्र, अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार, […]
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या दहशतवाद विरोधी पथकाने हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याचे मोठे यश संपादन केले आहे. सी.ई.आय.आर पोर्टलच्या सहाय्याने 2021 पासून हरविलेले एकूण 130 मोबाईल फोन, अंदाजे किंमत 19 लाख 45 हजार रुपये शोधून काढले आणि मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 श्रीमती मोनिका […]
नाशिकच्या महामार्ग बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरली. शनिवारी (३० नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली असून, यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. सुरेश तुकाराम रणसशिंग (रा. अंबाजीनगर, आरटीओ कॉर्नर, पंचवटी) हे आपल्या पत्नीसोबत सकाळी ११ च्या सुमारास महामार्ग बसस्थानकात आले होते. नाशिक-सोलापूर बसमध्ये बसत असताना अचानक गर्दी […]
नाशिक शहरात तापमानाचा पारा कालच्या ८.५ अंशांवरून आज ३ अंशांनी वाढून ११.५ अंशांवर पोहोचला आहे, तर कमाल तापमान २८ अंशांवर स्थिर आहे. येत्या काही दिवसांत किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फिंजल’ चक्रीवादळ काल तामिळनाडूच्या पाँडिचेरीजवळ आदळल्यानंतर कमकुवत होत हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. याचा […]
मुंबई : ‘एनसीसी’मधील सहभागामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यातील नेतृत्व गुणांचा विकास होतो. विकसित भारताचे उद्दिष्ट गाठताना महिलांची अर्थव्यवस्थेतील भागीदारी वाढणेही आवश्यक आहे. मुलींनी ‘एनसीसी’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. ‘एनसीसी’च्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण’ या विषयावर आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज शनिवारी (दि. 30 नोव्हेंबर) के. सी. महाविद्यालयाच्या […]