नाशिक लोकसभेतील मराठा उमेदवारांना समाजाच्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी एकाच व्यासपीठावर बसवणार

author
0 minutes, 0 seconds Read

नाशिक वृत्त :- सकल मराठा समाज नाशिक जिल्हाच्या वतीने नाशिकला (दि २५ एप्रिल रोजी) बैठक घेण्यात आली यामध्ये जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यासाठी अंतिम तयारी करण्यात आली, तसेच येत्या काही दिवसातच लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून सकल मराठा समन्वय समितीच्या भूमिकेबाबतीत एक पत्र देण्त्यायात येईल पत्रानुसार समाजासमोर भूमिका मांडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मराठा उमेदवारास एकाच व्यासपीठावर बोलवून आपली मराठा आरक्षणावरती भूमिका मांडावी यासंदर्भात एकमुखी चर्चा करून ठराव करण्यात आला.

      सकल मराठा समाज नाशिक जिल्हाच्यावतीने नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाची बैठक झाली.यावेळी सकल मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत बनकर व प्रा. हरीश आडके,उपोषणकर्ते नाना बच्छाव यांचे उपस्थितीत 

या बैठकीत सकल मराठा समाज संघटित राहावा,सर्वांशी संवाद व्हावा,व्यवस्थापण सुनियोजित असावे व समाजाच्या भूमिका जिल्हाभर नेण्यासाठी सकल मराठा समाज समन्वय समितीच्या रचणेसाठी अंतिम चर्चा घेण्यात आली, जिल्ह्यातील मराठा समाजाच्या संस्था,संघटनाची “एक संस्था, एक संघटना एक प्रतिनिधी”अशी रचना करण्यात येणार आहे, त्याची यादी तयार करण्याचे काम सुरळीत व्हावे यादृष्टीने बैठक (दि २५ एप्रिल रोजी) बैठक झाली.यावेळी नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवाराला सकल मराठा समाजावतीने मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यातील मराठा समाजासाठी ५० टक्के आत ओबीसी तून मराठा आरक्षण,सगेसोयरे अधिसूचनेची कुठलीही कारणे ण देता ठोस अंमलबजावणी करणे,मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे वरील एस आय टी,असंख्य मराठा आंदोलकावर झालेल्या सुडाने केलेल्या केसेस,व अंतरवेलच्या मराठा समाजावर जुल्मी लाठीचार्ज,बाबतीत उमेदवार काय भूमिका घेणार?राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या ,मराठा युवक आत्महत्या यांच्या निराधार झालेल्या कुटुंबाची विवंचना उपेक्षा, तसेच अन्य विषयावर याबाबतीत मराठा उमेदवारानी आपली भूमिका समाजासमोर मांडावी यासाठी यावेळी नियोजन करण्यात आले.
त्यासंदर्भात तीन दिवसात जिल्हा समन्वय समिती जाहीर करुन पुढील प्रयोजन होईल असे ही ठराव एकमुखी घेण्यात आले.

दरम्यान यावेळी सकल मराठा समाज जिल्हा समन्वय समिती स्थापने बाबतीत संस्था संघटनांची यादी तयार करण्यात आली,त्याबाबतीत एक घटना नियमावली बनवून सुनियोजित व्यवस्थापन व्हावे,या कामी ही समिती कार्यरत राहील असे ठरवन्यात आले. नाव नोंदणीस
राहिलेल्या मराठा संस्था,संघटनानी तातडीने नाना बच्छाव यांना आपला एक प्रतिनिधी, त्याचा फोन, संघटना संस्था नाव व्हाट्स ap ला कळवावे,सोबत आधार कार्ड, पैनकार्ड झेरॉक्स व एक फोटो आणून द्यावा,असा निर्णय झाला,

 या बैठकीत सकल मराठा समाजाचे मार्गदर्शक चंद्रकांत बनकर,प्रा. हरीश आडके सर,मराठा आंदोलनातील उपोषण कर्ते नाना बच्छाव,प्रचार प्रमुख राम खुर्दळ, योगेश नाटकर पाटील,श्रीराम निकम,विकी गायधनी, ज्ञानेश्वर सुरासे, सागर वाबळे,ad गौरव गाजरे,अण्णा पिंपळे,मंगेश पाटील, शिरीष जोंधळे,महेंद्र बेहेरे,सुनील पवार, सागर बागुल,अनिल आहेर, शिवाजीराव बल्लाळ,बी एस बोखारे, प्रल्हाद जाधव,संजय आढाव,राहुल जगताव, हर्षल खैरनार,संजय उढान यावेळी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *