google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

जालना ते मुंबई वंदे भारत रेल्वेचे सीएसटी येथे उत्साहात स्वागत…

मुंबई :- मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरू व्हावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजपासून सुरु झालेली जालना- मुंबई वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे देखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होतेमुख्यमंत्र्यांनी मुंबई […]

२ जानेवारीला पुन्हा राजकीय नेते,संस्था,संघटनांनी एकत्रित नाशकात बैठक…

मराठे एकत्रित शिवतीर्थावरुन मुंबईस निघतील, तत्पूर्वी तालुकावार मराठा समाजाची जागृतीचे आजच्या बैठकीत नियोजन, नाशिक :- मराठा क्रांती योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली पासून असंख्य मराठ्यांना घेवून थेट मुंबईस निघतील,दरम्यान नाशिकहून मराठा समाजाचे आपण सर्व जण ठरेल त्या दिवशी नाशिकच्या शिवतीर्थावर जमू तेथून मुंबईस गाड्यांसह ,सर्व लवाजमा घेवून मुंबईस मराठा आंदोलनासाठी प्रस्थान करू,असा निर्णय घेवून सकल […]

जालना शहरातील गणपती नेत्रालय समोर जबरी चोरी करणारा गुन्हेगार सहा तासात जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

जालना वृत्त:- जालना शहरात दिनांक 29/12/2023 पहाटे सहा वाजता गणपती नेत्रालय येथे उपचार कामी आलेल्या इसमास दोन अज्ञात आरोपीतांनी चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल जबरीने चोरी केले प्रकरणी पोलीस ठाणे सदरबाजार जालना येथे गुन्हा दाखल झाला. सदर चा गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे साहेब यांनी स्थानिक गुन्हे […]

‘जेएन-१’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई :- राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स‘’ स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता […]

नाशिक येथे १ जानेवारी रोजी होणारा छावा क्रांतिवीर सेनेचा १० वा वर्धापन यशस्वी करण्यासाठी कामाला लागा – करण गायक

नाशिक वृत्त:- छावा क्रांतिवीर सेनेच्या नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक सौभाग्य लॉन्स पपया नर्सरी या ठिकाणी संपन्न झाली.या बैठकीमध्ये येत्या १ जानेवारी २०२४ रोजी संघटनेचा १० वा वर्धापन दिन तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा याबाबत नियोजन आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये सदर कार्यक्रमा संदर्भात विविध समिती गठीत करत प्रत्येक पदाधिकारी […]

रंजल्या गांजलेल्याची,मुक्या जीवाची सेवा हा भक्तिमार्गच…

नाना बच्छाव यास आद्यकवी महदंबा स्मृती पुरस्कार वितरण, गिरणारे ता नाशिक येथील दत्तजयंती उत्सवात पूज्य सुकेनेकरबाबा शास्त्रीचे निरूपण. नाशिक :- रंजल्या गांजलेल्यांची सेवा,मुक्या जीवाला आपलेसे करा हीच तर परमेश्वराची भक्ती आहे.निरपेक्ष सेवा हाच भक्तीचा मूळ पाया आहे असे निरूपण श्रीदत्त जन्मोत्सवानिमित गिरनारे तां नाशिक येथील एकमुखी दत्त मंदिर परिसरात आयोजित कवी महदंबा स्मृतिदिनी केले.यावेळी शेतकरी […]

२० जानेवारीला लाखोच्या संख्येने नाशिककर मराठा समाज दिंडीने जाणार मुंबईत…

नाशिकच्या सकल मराठा समाजाचे १०५ व्या दिवशी आंदोलनाची नाशिकच्या शिवतीर्थावर सांगता नाशिक:- नाशिकहून असंख्य मराठा वारकरी दिंडी ने २० जानेवारीला कूच करायची आहे,याकामी गाव खेड्यांपर्यंत मराठा समाजाचा शेवटचा माणूस ही या आंदोलनात जोडायचा आहे.त्यासाठी मराठा गाव सभा घेण्याबाबत नियोजन यावेळी करण्याचा निर्णय नाशिकच्या शिवतीर्थावर सकल मराठा समाजाने घेतला,याकामी मराठा समाजाने सामील व्हावे असे आवाहन व […]

नामदार नरहरी झिरवाळ यांनी धार्मिक कार्यक्रमात धरला ठेका…

नाशिक :- दिंडोरी मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय नरहरी झिरवाळ यांनी आपल्यातील भजनी, कलावंत, कवी, लोककला , किर्तनकार , हा वेळोवळी प्रासंगिक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आदी ठिकाणी आपल्यातील सुप्त गुणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले आहे मग मी आमदार आहे मी नामदार आहे हे सगळे प्रोर्टोकाॅल बाजुला ठेवत ते जेथे जातात […]

मराठा आंदोलनात नाशिकची निर्णायक भूमिका ?

नाशिकच्या साखळी उपोषणकर्ते समर्पित,समाज विसरणार नाही, मंगळवारी शिवतीर्थावर 105 व्या दिवसी आंदोलनाची सांगता, नाशिक :- सकल मराठा समाजाची बैठक (दिनांक २३ रोजी)नाशिकच्या शिवतीर्थावर झाली.या बैठकीतमराठा क्रांतीयोद्धा मनोज जरांगे पाटील देतील त्या इशाऱ्यावर आम्ही नाशिकचा भव्य सहभाग मुंबईच्या निर्णायक आंदोलनात नोंदवेल,मुंबईपासून नाशिक जवळ असल्याने नाशिक मोठ्या संख्येने सहभागी होईल.तसेच नाशिकच्या साखळी उपोषणात मुख्य उपोषणकर्ते नाना बच्छाव […]

कोरोना जेएन-वन व्हेरिएंटला नागरिकांनो घाबरू नका,काळजी घ्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश नागरिकांनो घाबरू नका,काळजी घ्या राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध ठाणे :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]