नाशिक :- श्री भक्तीधारा अध्यात्मिक परिवार आपलं फिल्म प्रोडक्शन आणि समर्पण व आधार महिला व बालहक्क संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने समाज रत्न व आदर्श शिक्षक पुरस्कार सोळा संपन्न झाला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचमुखी हनुमान संस्थान चे महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब बच्छाव ग्राहक मंचच्या आशाताई पाटील अनु फिल्म प्रोडक्शन चे निर्माते दिग्दर्शक भरत जोशी सर ओम शांती च्या ब्रह्मकुमारी पुष्पा दीदी. सिने अभिनेते राजेंद्र माने सिने अभिनेत्री इशिका सूर्यवंशी समाज रत्न व आदर्श शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजक ह.भ.प. श्रीमंत महाराज बागल लातूरकर आपला महाराष्ट्र न्यूज पोर्टल चे संपादक ज्ञानेश्वर सुरासे कृषी मार्गदर्शक प्रल्हाद जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात काम करून आपल्या कार्यप्रणालीने आपली छबी निर्माण करणाऱ्या समाजातील रत्नांचा समाज रत्न व समाजाला ज्ञान देऊन प्रबोधन करणाऱ्या मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले..
याप्रसंगी श्री भक्तीधाराच्या वतीने महाराष्ट्रभर चालत असलेल्या अध्यात्मिक चळवळीबद्दल तसेच समर्पण स्व आधार चे माध्यमातून महिलांना व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय उभारणीसाठी केले जाणारी मदत कौटुंबिक समुपदेशनाविषयी चालवली जाणारी चळवळ आपलं फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातून कलाकारांच्या हितासाठी चालविण्यात येणारे उपक्रम व सध्या निर्मित केलेले चित्रपट व मालिका विषयी व आगामी नियोजनाविषयी ह.भ.प. श्रीमंत महाराज बागल लातूरकर यांनी प्रस्तावनेतून माहिती दिली..
त्याचबरोबर शिशु विकास योजना या योजनेच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या हितासाठी चालू असलेली उपक्रम एकूण बाराशे कंपन्यांच्या माध्यमातून सीआरएस फंडातून चालत असलेला हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यासाठी समर्पण स्वाधार महिला व बालक संरक्षण समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत असून नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत रोजगार निर्मितीचे काम हे या माध्यमातून होत आहे असेही बोलताना यावेळी ते म्हणाले…
श्री भक्तीधारा व ह .भ.प. श्रीमंत महाराज बागल यांच्या माध्यमातून चालत असणारे उपक्रम हे समाजासाठी कामधेनु असणार आहेत यांच्या या उपक्रमाला कोटी कोटी आशीर्वाद आणि आपलं फिल्म प्रोडक्शन च्या माध्यमातून जय जगन्नाथ नावाच्या चित्रपटाची निर्मिती करावी आम्ही संपूर्ण पाठवा देण्यास तयार आहे असे आशीर्वाद महंत डॉक्टर भक्तीचरणदास महाराज यांनी दिले तर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलेल्या संकटापासून वाचण्यासाठी नानासाहेब बच्छाव सतत आपल्या पाठीशी राहतील असे प्रमुख पाहुणे नानासाहेब बच्छाव यांनी भावपूर्ण श्रद्धांजलीआपल्या जीवनात कधीही निराशा येणार नाही विजयाची आशा कायम पल्लवीत राहील यासाठी मी प्रयत्न करेन असे पाठबळ ग्राहक मंचाच्याआशाताई पाटील यांनी आपले शब्दातून व्यक्त केले कार्यक्रमासाठी एकूण 51 पुरस्कारार्थी होते.. त्यापैकी प्रामुख्याने खालील लोकांची उपस्थिती होती.
पुढील प्रमाणे.
१) पुष्पा दीदी ओम शांती२) डॉ. आशालता देवळीकर ३) श्री. राजू घोटेकर ४) DJ मॉन्टी ५) मोनालिसा जैन ६) रसिका गायकवाड ७) नुपूर ठाकुर ८) सुनिता पाटील ९) प्रा. अमोल चंद्रमोडे १०) प्रा. राहुल आव्हाड ११) डॉ. स्वराली देवळीकर १२) ह. भ. प. ज्ञानेश्वरमाऊली तुपे १३) ॲड. एकता कदम १४) ॲड. दीपिका पाटिल १५) श्री. अभिजित जुन्नरकर १६) कु. अश्विनी पुरी १७) श्री. आकाश धबडगे १८) RJ. प्रथम उमाळकर १९) ॲड. अश्विनी देशपांडे २०) डॉ. निर्मला कोटणीस २१) श्री. विजय खंडागळे २२) भाग्यश्री कणव २३) प्रणिता भाटकर २४) श्री. प्रशांत साठे २५) प्रा. दिलीप फडोळ २६) रितू नथानी २७) शरण्या शेट्टी २८) शितल माळी २९) श्री. संजय कानडे ३०) श्री रमेश अय्यर ३१) श्री. रोहन मेहता ३२) श्रीमती. प्रभा मुंदडा ३३) श्रीमती. माधुरी शिरसाट ३४) श्रीमती. लता काळे ३५) सनी वाघ ३६) सोनी सोनसळे ३७) सौ. रागिणी पाटिल ३८) सौ. कविता कुलथे ३९) सौ. केतकी बेलापूरकर (देशपांडे) ४०) सौ. सुनिता गायकवाड ४१) हर्षाली भोसले. सरोज परदेशी.सौ. गीता तुषार सामसुखा
त्याचबरोबर आपलं फिल्म प्रोडक्शन रुद्राक्षम थिएटर्स रुद्र आर्या एंटरटेनमेंट यांनी संयुक्त विद्यमाने निर्मित केलेला दीपक चंडालिया लिखित संतोष राठोड दिग्दर्शित नाशिक येथील प्रसिद्ध हॉटेलचे संचालक वैभव भगत यांच्या अभिनयाने व नवोदित अभिनेत्री विधी खैरनार यांच्या अभिनयाने नंदकिशोर आघाव यांच्या सुमधुर गीताने व संपूर्ण टीमच्या सहकार्याने उभा राहिलेला गणराया तू या चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टरचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी चित्रपट निर्मितीची संपूर्ण टीम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. श्रीमंत महाराज बागल आपला महाराष्ट्र न्यूज चे संपादक ज्ञानेश्वर सूरोसे अनिकेत खालकर शेतकरी मित्र प्रल्हाद जाधव आदींनी परिश्रम घेतले
त्याचबरोबर शिशु विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला फिल्म प्रोडक्शन मानस आर्केड या कार्यालयाशी भेट देण्याचे आवाहन हभप श्रीमंत महाराज बागल यांनी केले