google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. चिंतामणी ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने गणेश कला व क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय […]

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा! मुंबई, पुण्यासह राज्यात असे असेल वातावरण

कोकणात आज देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात काही जिल्ह्यात अतिमुळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई पुण्यासह विदर्भात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना […]

नाशिकमध्ये खुन्नस काढण्यासाठी राडा; बजरंगवाडीत मध्यरात्री ताेडफाेड

पुणे राेडवरील नासर्डी पुलाजवळील बजरंगवाडी परिसरात मद्यपिंच्या टाेळक्याने रविवारी रात्री तुफान राडा घातला. खुन्नस काढण्यासाठी एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक करुन शांतता धाेक्यात आणली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून दाेन्ही गटांतील १२ ते १५ जणांविराेधात बेकायदेशिर जमाव जमविल्यासह वाहनांचे नुकसान केल्याचा गुन्हा मुंबईनाका पाेलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तसेच एका गटातील तिघांना […]

पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला!

राज्यात उद्या आषाढी एकादशी निमित्त हजारो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मध्यरात्री १ च्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला आहे. डोंबिवली येथून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या बसला ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली असून या भीषण अपघात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती […]

मोठी बातमी : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द…

राज्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांची मालिका सुरुच आहे. त्यात अनेकांच्या प्रिय व्यक्तींना गमविण्याची वेळ आली आहे. बड्या धेंडांना वाचविण्यासाठी प्रशासनाची तत्परता पण दिसून आली आहे. देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असल्याने अखेर राज्याच्या सांस्कृतिक राजधानी, पुण्यात पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तळीरामांची तंद्री उडणार आहे. या शहरात दारु पिऊन वाहन चालविता येणार […]

मुख्यमंत्री म्हणतात.. आंदोलन करू नका, मी प्रश्न सोडवतो…

मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना घेवून राज्यभरात व्हॉईस ऑफ मीडियाने लाक्षणिक उपोषण करून राज्य सरकारला पत्रकारांसाठी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये ३४२ ठिकाणी पत्रकार रस्त्यावर उतरले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपविभागीय कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनामध्ये हजारो पत्रकार रस्त्यावर उतरले होते. या मागण्यांसंदर्भात व्हॉईस […]

पुण्यात लाँच झाली सीएनजी बाईक, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन! 

जगातली पहिली सीएनजी बाईक आज पुण्यात लाँच झाली आहे. बजाज कंपनीने सीएनजी बाईकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाईक लाँचचा सोहळा पार पडला. सीएनजीवर धावणारी ही पहिली दुचाकी आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे. १२५ सीसीचं इंजिन असलेली ही बाईक आहे. या बाईकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपांची संख्या वाढवावी अशी […]

 पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळली असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. एरंडवणा येथील एक डॉक्टर व त्याच्या मुलीला हा संसर्ग झाला असून या दोघांना ताप व अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे आहेत. आरोग्य विभागाने याची तातडीने दखल घेत त्यांच्यावर उपचार […]

कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात मुळसाधार पावसाची शक्यता :- हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आज काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत देखील मध्यम पावसासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार पावसाची […]

उच्चशिक्षितांनी नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व व्हावे- राज्यपाल

पुणे, दि. २५: उच्चशिक्षित, पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व आणि स्टार्टअप निर्माते बनावे. तसेच गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आदी इतर कारणांमुळे समाजाच्या परिघावर जगणाऱ्यांचा विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान सोहळ्यात श्री. बैस बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे अध्यक्ष आणि संस्थापक […]