google.com, pub-6440632152563755, DIRECT, f08c47fec0942fa0

मोदी-शहांची ‘लाडका मित्र’ योजना, मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव, धारावीवरुन ठाकरे आक्रमक

‘आमचं सरकार आल्यानंतर धारावी टेंडर रद्द करू आणि धारावीकरांच्या हिताचे टेंडर आणू.’ असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘मुंबईला लुटायचे, मुंबईला भिकेला लावायचे कारस्थान आम्ही होऊ देणार नाही.’, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. धारावीमधील झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी उद्योग समूहाला […]

विधानसभेला होणार सुपरफास्ट व्होटींग!

लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. एकाच मतदान केंद्रावर मतदारांची संख्या वाढल्याने हा गोंधळ झाल्याने आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला असून तशापद्धतीच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला केल्या आहेत. राजकीय पक्षांनी मुंबईमध्ये लोकसभा मतदानाच्या वेळेस झालेल्या […]

गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्याचा  निर्धार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई:  महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ माओवादी ठार झाले असून घटनास्थळावरून पोलिसांनी स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. या यशस्वी कारवाईबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी (ऑपरेशन्स) यांच्या नेतृत्वाखाली ७ सी ६०पथकांनी विशेष ऑपरेशन सुरू केले. वांडोली गावाजवळ […]

तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त राज्यातील लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असून पंढरपूर नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवन’च्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

प्रकाश आंबेडकर आज मोठी घोषणा करणार; राजकारणात मोठी उलथापालथ होणार?

छ. संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज (16 जुलै) मोठी घोषणा करणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदार शासकीय विश्रामगृहावर आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता […]

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी!

नाशिक : जुलै महिन्याचा पंधरवडा उलटला तरीदेखील नाशिक जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यातच मागील वर्षी नाशिकमध्ये दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे नाशिककरांवर भीषण पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. येत्या काही दिवसात नाशिकमध्ये जोरदार पावसाला बरसला नाहीतर नाशिकमध्ये पाणीकपातीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पाणीकपातीबाबत मोठी घोषणा […]

आता फक्त एक QR कोड स्कॅन करा आणि लाडकी बहीण योजेनेचे लाभार्थी व्हा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेची संपुर्ण मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचावे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा आणि त्यांची अर्जासाठी शोधाशोध होऊ नये म्हणून क्यु आर कोड असलेला पहिला बॅनर झळकवण्यात आला आहे. […]

विधान परिषदेतील विजयानंतर अजित पवार दिल्लीत, दोन नेत्यांच्या भेटीत नेमके काय घडले?

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाच जागांवर विजय मिळवत शरद पवार यांना धक्का दिला. त्याचवेळी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने दोन, दोन जागा जिंकल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या या यशानंतर उपमुख्यमंत्री […]

वसंत मोरे आज शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात करणार प्रवेश

वसंत मोरे हे मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार. मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव […]

‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. ०८: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गत दोन वर्षात राबविलेल्या विविध उपक्रम व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, देशाचा […]